भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या कार्यकर्त्यांना अटक, पश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटलं

पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक भागात हिंसाचार उफाळून आला होता. यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटले. त्यानंतर आता भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर येत आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आरोपी आहेत.

भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या कार्यकर्त्यांना अटक, पश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटलं
सुवेंदू अधिकारी, ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 12:37 PM

कलकत्ता : पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात हिंसाचाराच्या (West Bengal Violence) अनेक घटना समोर आल्या होत्या. या हिंसाचारावरून भाजप ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आता भाजपाचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. ममता बॅनर्जी यांचं सरकार (Mamata Government)  बलात्काराला राजकीय हत्यारासारखं वापरत असल्याचा घणाघात सुवेंदु अधिकारी यांनी केला आहे. Mamata Banerjee has been criticized by Suvendu Adhikari for gang-raping a BJP worker’s wife by Trinamool Congress workers.

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर अत्याचार

दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या मूक पत्नीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली होती. पीडित महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलीय. ही घटना समोर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसनेही आरोपींना कडक शिक्षा होण्याची मागणी केली आहे. अमता विधानसभा मतदारसंघातल्या बागनानमधली आहे.

न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार

भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी याबाबत ट्विट करत ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”महिला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात बलात्कार हे राजकीय शस्त्र म्हणून वापरले जात आहे, हे विचित्र आहे. मी भाजप कार्यकर्ता हरीसाधन पॉल यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्यावर टीएमसी कार्यकर्त्यांनी बागानानमध्ये क्रूरपणे बलात्कार केला होता. उत्तम उपचार आणि काळजी घेण्यासाठी तिला चांगल्या रुग्णालयात हलवणे ही पहिली प्राथमिकता होती. पोलीस आणि प्रशासन या अमानुष गुन्ह्यातील गुन्हेगारांना लपवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पीडितेला न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही,” असं ट्विट सुवेंदु अधिकारी यांनी केलं आहे.

काय आहे घटना?

पश्चिम बंगालच्या अमता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बागानानमध्ये ही अत्याचाराची घटना घडली. शनिवारी पीडित महिली घरात एकटी होती. तिचे पती काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साडेबारा वाजता तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक प्रमुख कुतुबुद्दीन मलिक आणि टीएमसी युवा अध्यक्ष देवाशीष राणा इतर तीन लोकांसह भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले. यावेळी 5 जणांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पती घरी आल्यानंतर त्याला ही घटना समजली. त्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर तीन जण अजूनही फरार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला अत्याचार

पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक भागात हिंसाचार उफाळून आला होता. यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटले. त्यानंतर आता भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर येत आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आरोपी आहेत. त्यामुळे या घटनेवरूनही पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. (Mamata Banerjee has been criticized by Suvendu Adhikari for gang-raping a BJP worker’s wife by Trinamool Congress workers)

संबंधित बातम्या :

VIDEO | वेडा म्हणून वारंवार चिडवल्याने तरुणाची काठीने मारहाण, सात जणांकडून तरुणाचीच हत्या

अभ्यासावरुन रागावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, आत्महत्या केल्याचा बनाव

बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.