Oil Bath Video : चक्क तेलाच्या टँकमध्ये केली अंघोळ, सुटे तेल घेण्याआधी हा व्हिडीओ बघाच!
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस तेलाच्या टँकमध्ये डुबकी घेताना दिसतोय. तो फक्त तेलाच्या टँकमध्ये उतरला नाही, तर त्याने आपलं संपूर्ण शरीरच तेलात बुडवल्याचं दिसतंय.

Tukaram Mundhe Oil Rule : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न व औषध पुरवठा विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नात होणारी भेसळ कमी झाली आहे. अन्नपदार्थांचा दर्जा तसेच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री, उत्पादनावर बंधनं आली आहेत. अलीकडेच तुकाराम मुंढे यांनी खुले म्हणजेच सुटे खाद्यतेल विकण्यावर बंदी घातली आहे. सोबतच मुंढे यांनी तेल विक्री करण्यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात सुटे तेल विकण्यास बंदी घातलेली असतानाच आता एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क तेलाच्या टँकमध्ये अंघोळ करतोय.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस तेलाच्या टँकमध्ये डुबकी घेताना दिसतोय. तो फक्त तेलाच्या टँकमध्ये उतरला नाही, तर त्याने आपलं संपूर्ण शरीरच तेलात बुडवल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. त्याच्या बाजूलाच एक माणूस उभा असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा माणूसही तेलाच्या टँकवरच उभा आहे.
दरम्यान, एक्स या समाजमाध्यमावरील @KUNDAN00PATEL या खात्यावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बाजारातील सुटे तेल खरेदी करण्याआधी हा व्हिडीओ जरूर पाहा, असे आवाहन या युजरने केले आहे. दरम्यान व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. परंतु सुटे तेल खरेदी करताना हजार वेळा विचार करावा, अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे की अन्य राज्यातील याचीही पुष्टी होऊ शकलेली नाही.
सरसों का तेल के साथ यह भी होता है 🥹
बाजार का सरसों का तेल लेने से पहले यह जरुर सोचना लेना
मित्रों की जो तेल आप ले रहे हैं वह आपके मानकों पर सही हैयह देखकर में बहुत विचलित हु क्या इंसान ही इंसान को यहां
पर नुकसान पहुंचाने की मानसिकता रखता है एसा भी होता है pic.twitter.com/YQMGoRXGn7— KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) August 23, 2026
महाराष्ट्रात तेल विक्रीचे नियम काय?
दरम्यान, तेल विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासनाने काही नियमावली सांगितली आहे. सुटे तेल दुकानादारांना विकता येणार नाही. रिलेबलिंग चुकींच्या पद्धतीनं करू नये. तेलाची निर्मिती करणारे सर्व उत्पादन करणाऱ्या सर्वांसाठी हा नियम लागू असेल. तेल कसं तयार केलेलं आहे त्यांची संपूर्ण माहिती लेबलिंगवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तेल विकताना तेल व्यवस्थित पँकेजिंगच्या माध्यमातून विकावे लागणार आहे. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यात आजन्म कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद आहे असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.