AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oil Bath Video : चक्क तेलाच्या टँकमध्ये केली अंघोळ, सुटे तेल घेण्याआधी हा व्हिडीओ बघाच!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस तेलाच्या टँकमध्ये डुबकी घेताना दिसतोय. तो फक्त तेलाच्या टँकमध्ये उतरला नाही, तर त्याने आपलं संपूर्ण शरीरच तेलात बुडवल्याचं दिसतंय.

Oil Bath Video : चक्क तेलाच्या टँकमध्ये केली अंघोळ, सुटे तेल घेण्याआधी हा व्हिडीओ बघाच!
oil bath viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 9:25 PM
Share

Tukaram Mundhe Oil Rule : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न व औषध पुरवठा विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नात होणारी भेसळ कमी झाली आहे. अन्नपदार्थांचा दर्जा तसेच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री, उत्पादनावर बंधनं आली आहेत. अलीकडेच तुकाराम मुंढे यांनी खुले म्हणजेच सुटे खाद्यतेल विकण्यावर बंदी घातली आहे. सोबतच मुंढे यांनी तेल विक्री करण्यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात सुटे तेल विकण्यास बंदी घातलेली असतानाच आता एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क तेलाच्या टँकमध्ये अंघोळ करतोय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस तेलाच्या टँकमध्ये डुबकी घेताना दिसतोय. तो फक्त तेलाच्या टँकमध्ये उतरला नाही, तर त्याने आपलं संपूर्ण शरीरच तेलात बुडवल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. त्याच्या बाजूलाच एक माणूस उभा असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा माणूसही तेलाच्या टँकवरच उभा आहे.

दरम्यान, एक्स या समाजमाध्यमावरील @KUNDAN00PATEL या खात्यावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बाजारातील सुटे तेल खरेदी करण्याआधी हा व्हिडीओ जरूर पाहा, असे आवाहन या युजरने केले आहे. दरम्यान व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. परंतु सुटे तेल खरेदी करताना हजार वेळा विचार करावा, अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे की अन्य राज्यातील याचीही पुष्टी होऊ शकलेली नाही.

महाराष्ट्रात तेल विक्रीचे नियम काय?

दरम्यान, तेल विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासनाने काही नियमावली सांगितली आहे. सुटे तेल दुकानादारांना विकता येणार नाही. रिलेबलिंग चुकींच्या पद्धतीनं करू नये. तेलाची निर्मिती करणारे सर्व उत्पादन करणाऱ्या सर्वांसाठी हा नियम लागू असेल. तेल कसं तयार केलेलं आहे त्यांची संपूर्ण माहिती लेबलिंगवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेल विकताना तेल व्यवस्थित पँकेजिंगच्या माध्यमातून विकावे लागणार आहे. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यात आजन्म कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद आहे असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

Follow Us
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल