AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांग्याचं भरीत बनलं काळ, तिघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू,एका गोष्टीने पोलिसांना आला संशय..

आदल्या रात्री वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर या तिघी बहिणी अत्यवस्थ झाल्या. त्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे मुलींच्या पालकांनी म्हटले आहे. मात्र, पोलीसांना एका गोष्टीने संशय आला....

वांग्याचं भरीत बनलं काळ, तिघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू,एका गोष्टीने पोलिसांना आला संशय..
baigan bharta
| Updated on: Aug 23, 2026 | 9:17 PM
Share

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील भायखळ्यात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता तीन सख्ख्या बहिणींचा वांग्याचे भरीत खाल्ल्याने संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांनी दावा केला आहे की वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर तिघींची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलींच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, आदल्या रात्री वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर या तिघी बहिणी अत्यवस्थ झाल्या. मात्र,याच अन्नपदार्थांमुळे अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांना संशय आला.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.येथील मातगुवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपोरा खुर्द गावाची ही घटना आहे. या प्रकरणात तिघी बहिणींनी वांग्याचे भरत खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, कुटुंबियांनी या मुलींचे पोलिसांना न कळवता दफन केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

पिपोरा खुर्द गावातील सात वर्षांची पूनम, तीन वर्षांची मनिषा आणि अवघ्या ९ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह आता कबरीतून बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पोस्टमार्टेम केले जाणार आहे. यानंतरच या प्रकरणातील नेमका मृत्यू कसा झाला याची माहिती उघडकीस येऊ शकते असे म्हटले जात आहे. या संदर्भात मातगुवा पोलीस ठाण प्रमुख अंकुर चौबे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिस प्रशासनाने मृतदेहांना बाहेर काढण्याची कारवाई करण्यासाठी प्रशासनाची मंजूरी मागितली आहे, त्या मुलींच्या मृत्यूचे कारण त्यामुळे नक्की फूड पॉयझन की अन्य काही होते याची माहिती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

Follow Us
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल