
जन्मदात्या आईची हत्या करून फरार झालेल्या एका आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने संपत्तीसाठी आपल्या आईची हत्या केली होती. तो व्यसनामुळे काही गोष्टी विसरत होता, यामुळे त्याने आपल्या आईला संपवलं होतं. त्यानंतर तो नेपाळला पळून गेला होता. तिथे तो इंग्रजीचा शिक्षक म्हणून नोकरी करच होती. मात्र तो परदेशात असतानाही त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव अनिमेश झा असं आहे. तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आता त्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दिल्लीतील द्वारका परिसरातील एका फ्लॅटमध्ये अनिमेश झा आणि त्याची आई राहत होते. 2017 साली अनिमेश दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याने आईकडे पैसे मागितले. मात्र आईने नकार दिल्याने तो संतापला आणि त्यांने आईचे डोके भिंतीवर आपटण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आईच्या गळ्यात दोरी गुंडाळली आणि तिचा गळा दाबला. यामुळे ती बेशुद्ध पडली नंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अनिमेशने आईला बेडवर ओढले आणि तो फरार झाला. तीन दिवस घरात आईचा मृतदेह होता.
अनिमेशची बहीण लंडनमध्ये डॉक्टर आहे. ती तिच्या आईला फोन करत होती, मात्र आईने तिचा फोन उचलला नाही. दोन दिवस झाले तरीही उत्तर मिळाले नाही त्यामुळे तिने तिच्या शेजाऱ्यांना फोन केला. त्यानंतर पोलीसांनी दरवाजा तोडला आणि त्यांनी आईचा मृतदेह सापडला. तोपर्यंत अनिमेश बेपत्ता होता. पोलीसांनी डिजिटल तपास करत पोलीसांना तो बिहारमधील पाटणा येथे गेल्याचे समजले. त्यामेळे तो पोलिसांच्या ताब्यात सापडला.
आईच्या हत्येप्रकरणी अनिमेश 3 वर्षे तिहार तुरुंगात होता. मात्र 2020 मध्ये कोरोनामुळे त्याला जामीन मिळाला. तो बाहेर आल्यानंतर गायब झाला. त्यावंतर तो पाच वर्षे नेपाळमध्ये लपला. त्याने सुरुवातीला वेटर म्हणून काम केले, नंतर काठमांडूमधील शाळेत सहावीपर्यंतच्या मुलांना इंग्रजी शिकवायला लागला. पाच वर्षांनंतर त्याला वाटले की, आता प्रकरण शांत झाले असेल, त्यामुळे तो सक्रिय झाला. मात्र पोलीसांची त्याच्यावर नजर होती.
दिल्ली पोलीसांनी त्याला अटक करण्यासाठी एक विशेष टीम तयार केली. अनिमेशने मित्राला पाठवलेल्या मेसेजद्वारे तो काठमांडू असल्याचे समजले. नेपाळ पोलीसांशी संपर्क साधून अनिमेशला सोनौली सीमेवर बोलावण्यात आले आणि 5 डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता, ‘आई मला पैसे देत नव्हती. मला वाटले की ती माझ्या बहिणीला संपत्ती देईल. त्यामुळे मी तिला मारले.’