AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Viral Video | ‘अशी अनेक प्रकरण घडली आहेत’, व्हायरल व्हिडिओवर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच धक्कादायक वक्तव्य

Manipur Viral Video | एकाच प्रकारचे 100 FIR. या घटनेमुळे देश हादरलाय. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

Manipur Viral Video | 'अशी अनेक प्रकरण घडली आहेत', व्हायरल व्हिडिओवर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच धक्कादायक वक्तव्य
Manipur Viral Video cm n biren singh
Updated on: Jul 20, 2023 | 3:04 PM
Share

नवी दिल्ली : मणिपूरच्या घटनेमुळे प्रत्येकजण हैराण आणि त्रस्त आहे. जातीय हिंसाचाराची ही आग इतकी पसरलीय की, त्यामध्ये सर्व मर्यादा पार झाल्या आहेत. 4 मे रोजी भयानक घटना घडली. आता त्याचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेमुळे देश हादरलाय. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. आता जवळपास अडीच महिन्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारच्या बेजबाबदारपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतय. कारण जून महिन्यात FIR दाखल झाल्यानंतर काही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वक्तव्यातूनही किती मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणा झालाय ते स्पष्ट होतय. “अशा प्रकारच्या 100 एफआयआर झाल्या आहेत. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला, तेव्हा दखल घेण्यात आली” असं बिरेन सिंह म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती

एन. बिरेन सिंह यांनी एका खासगी चॅनलला इंटरव्यू दिला. “व्हिडिओ बद्दल कालच समजलं. एकाच प्रकारचे 100 एफआयआर झालेत. अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडलेत. त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जे झालं, ते चुकीच आहे. या प्रकरणात एकाला अटक झालीय. आणखी कठोर कारवाई करण्यात येईल” असं बिरेन सिंह म्हणाले.

अत्यंत घृणास्पद कृत्य

या प्रकरणात एकाला अटक झाल्यानंतर मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी गुरुवारी सकाळी टि्वट केलं. “हे अमानवीय कृत्य सहन करणाऱ्या त्या दोन महिलांसोबत माझ्या संवेदना आहेत. पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेत कारवाई केली आहे. या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल. सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई होईल. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा विचार होईल. अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या समाजात स्थान नाही”

कसं घडलं हे?

मणिपूरच्या कांगकोपी जिल्ह्यात ही घटना झाली. गावावर उग्र जमावाने हल्ला केला. महिलांसोबत गैरवर्तन केलं. 4 मे रोजीच्या घटनेवर 20 जुलैला कारवाई झाली. पोलिसांनी एका दोषीला अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 19 जुलैला कारवाई केली, म्हणून पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. कुठल्या दोन समाजांमध्ये संघर्ष

4 मे रोजी घडलेल्या या घटनेवर 21 जूनला एफआयआर नोंदवण्यात आला. 12 कलमांतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये नगा-कुकी आणि मैतइ समुदायामध्ये संघर्ष सुरु आहे. यात 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्...
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्....
मराठी शाळा टिकवण्याची तळमळ! फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी भरते शाळा
मराठी शाळा टिकवण्याची तळमळ! फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी भरते शाळा.
महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी उचलल टोकाचं पाऊल
महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी उचलल टोकाचं पाऊल.