AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती 800 वाले माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग किती संपत्ती गेले सोडून, किती होते कर्ज?

Manmohan Singh Net Worth: माईनेता वेबसाइटने मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार त्यांच्याजवळ 30 हजार रुपये रोकड आहे. तसेच 3.86 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यांचा दिल्ली आणि चंडीगढमध्ये एक- एक फ्लॅट आहे.

मारुती 800 वाले माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग किती संपत्ती गेले सोडून, किती होते कर्ज?
Manmohan Singh
| Updated on: Dec 27, 2024 | 8:37 PM
Share

Manmohan Singh Net Worth: माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मनमोहन सिंग हे आपल्या मागे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सोडून गेले आहे.

किती आहे मनमोहन सिंग यांची संपत्ती?

मनमोहनसिंग यांनी सन 2018 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या संपत्तीची आणि कर्जाची माहिती दिली होती. त्यानुसार मनमोहन सिंग यांची संपत्ती 15.77 कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची 2018-19 मध्ये उत्पन्न 90 लाख रुपये होते.

माईनेता वेबसाइटने मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार त्यांच्याजवळ 30 हजार रुपये रोकड आहे. तसेच 3.86 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यांचा दिल्ली आणि चंडीगढमध्ये एक- एक फ्लॅट आहे. तसेच मनमोहन सिंग यांच्यावर काहीच कर्ज नाही.

जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ गमावला- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. मनमोहन सिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.