‘भारत कोरोनाच्या फक्त दोनच लसींवर थांबणार नाही, लवकरच देशी बनावटीच्या पुष्कळ लसी तयार होतील’

| Updated on: Jan 28, 2021 | 11:11 PM

गेल्यावर्षीच्या सुरुवातीला जगात कोरोनाची साथ आली तेव्हा भारताला त्याचा सर्वाधिक फटका बसेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते | PM Modi

भारत कोरोनाच्या फक्त दोनच लसींवर थांबणार नाही, लवकरच देशी बनावटीच्या पुष्कळ लसी तयार होतील
भारताने सार्वजनिक स्तरावर मोहीम उभारून कोरोनासाठीची आरोग्य यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उभे केले. भारताने केवळ स्वत:च्याच नागरिकांची काळजी घेतली नाही तर अन्य गरजू देशांना पीपीई किटस आणि मास्कचा पुरवठाही केला, हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
Follow us on

दावोस: भारत हा कोरोनाच्या केवळ दोनच लसी (Coronav vaccine) विकसित करुन थांबलेला नाही. लवकरच भारतात कोरोनावर मात करणाऱ्या देशी बनावटीच्या पुष्कळ लसी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PM Narendra Modi in Davos World Economic Forum)

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेला (Davos World Economic Forum) संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताच्या कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईचा प्रवास सर्वांसमोर मांडला. गेल्यावर्षीच्या सुरुवातीला जगात कोरोनाची साथ आली तेव्हा भारताला त्याचा सर्वाधिक फटका बसेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. भारतातील 70 ते 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण होईल. तर किमान दोन कोटी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, असे काहींनी सांगितले होते. जगातील प्रगत देशांतील पायाभूत सुविधा आणि आरोग्यव्यवस्था पाहता ही चिंता रास्त होती.

मात्र, भारताने सार्वजनिक स्तरावर मोहीम उभारून कोरोनासाठीची आरोग्य यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उभे केले. भारताने केवळ स्वत:च्याच नागरिकांची काळजी घेतली नाही तर अन्य गरजू देशांना पीपीई किटस आणि मास्कचा पुरवठाही केला, हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

अवघ्या 12 दिवसांत 20 लाख जणांचे लसीकरण

भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. या माध्यमातून अवघ्या 12 दिवसांत 20.3 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. आगामी काही महिन्यांमध्ये भारताकडून 3 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असणाऱ्या लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

चीनची लस फेल ठरल्यानंतर ब्राझीलची मदतीसाठी भारताकडे धाव

कोरोनाच्या देशव्यापी लसीकरणाला (Vaccination) अवघे काही तास उरले असतानाच आता ब्राझीलने भारताकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. ब्राझीलमध्ये यापूर्वीच लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, चिनी बनावटीची सिनोव्हॅक (Sinovac) लशीची परिणामकारकता खूपच कमी असल्याने ब्राझीलच्या अडचणी पुन्हा वाढल्या होत्या. त्यामुळे आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली होती.

संबंधित बातम्या:

लसीकरणामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल : प्रविण दरेकर

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया

प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात, पण सामान्यांचा नंबर कधी?; राजेश टोपे म्हणाले…

(PM Narendra Modi in Davos World Economic Forum)