प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात, पण सामान्यांचा नंबर कधी?; राजेश टोपे म्हणाले…

प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात, पण सामान्यांचा नंबर कधी?; राजेश टोपे म्हणाले...
राजेश टोपे, आरोग्य मंत्री

ज्यांना लस मिळाली नाही, त्यांनाही लस मिळणार आहे. आता आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रन्टलाईन वर्कर आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देऊ," असे टोपे म्हणाले. (Rajesh tope vaccination maharashtra)

prajwal dhage

|

Jan 16, 2021 | 12:53 PM

मुंबई : कोरोनाला थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (16 जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ केला. त्यानंतर महारष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर आता राज्यातील सामान्याना लस कधी मिळणार यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. “ज्यांना लस नाही, त्यांनाही लस मिळणार आहे. आता आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रन्टलाईन वर्कर आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देऊ,” असे टोपे म्हणाले. ते जालना येथे लसीकरण मोहिमेचे उद्धाटन केल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Rajesh tope comment on vaccination drive in maharashtra)

यावेळी ते म्हणाले, ” कोव्हिड योद्ध्यांनी आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. 11 महिने त्यांनी जीव धोक्यात घालून मेहनत केली. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आधी लस दिली. त्यानंतर फ्रन्टलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, नंतर सामान्यांना लस दिली जाईल.”

यावेळी बोलताना कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. “आपण प्रत्येकजण कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत होतो. आता लसीकरणास सुरुवात झाली आहे. ही लस सुरक्षित होती आणि आहे. याबाबतीत आम्ही यापूर्वीही सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा हाच संदेश दिलाय,” असे टोपे म्हणाले. तसेच यावेळी बोलताना 8 लाख आरोग्य फ्रन्टलाईन वर्कर्सनी लस घेऊन ही लस सुरक्षित असल्याचा जनतेला संदेश द्यावा असे आवाहन त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केले.

कुणालाही वऱ्यावर सोडणार नाही, केंद्राला पत्र लिहणार

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी प्रत्येकाला लस दिली जाईल असं सागितलं. लसीकरणासाठी 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाव नोंदवले आहे. त्यासाठी एकूण साडे सतरा लाख डोसेसची गरज पडणार आहे. राज्याला आणखी साडे सात लाख डोस हवे आहेत. असे असलेतरी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसेच, बाकीचे डोस लवकरात लवकर मिळावेत म्हणून केंद्राला पत्र लिहणार असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

Cm Uddhav Thackeray Corona Vaccination | सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क : मुख्यमंत्री

Corona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान

आपण टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले; यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी

(Rajesh tope comment on vaccination drive in maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें