आता ‘आधार’शी संबंधित अनेक सेवा आपल्या मोबाईलवर! घरबसल्या करु शकता अनेक महत्वाचे काम

यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने एम-आधार (mAadhar) मोबाईल App जारी केलं आहे. हे App तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

आता 'आधार'शी संबंधित अनेक सेवा आपल्या मोबाईलवर! घरबसल्या करु शकता अनेक महत्वाचे काम
आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी महत्त्वपूर्ण मानलं जाते. आधारकार्डच्या माध्यमातून आपण बऱ्याच सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता. पण जर तुमचं आधार कार्ड कुठे हरवले तर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच कधीकधी हरवलेल्या आधारकार्डाचा गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही.
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 3:20 PM

मुंबई : तुम्ही मोबाईलचा वापर फक्त बोलण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी करत असाल. पण तुमच्या मोबाईलद्वारे अनेक महत्वाची कामंही तुम्ही करु शकता. खासकरुन आधारशी संबंधित अनेक कामं तुम्ही घरबसल्या करु शकता. त्यात ई आधार डाऊनलोड करणं, त्याचं स्टेटस अपडेट करणं किंवा आधार केंद्राचा पत्ता शोधणं असे अनेक कामं तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करु शकता. इतकच नाही तर आधारशी संबंधित जवळपास 35 योजना आहेत ज्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे आरामात मिळवू शकता.(Many services related to Aadhaar are available to you through the mobile app mAadhar)

त्यासाठी यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने एम-आधार (mAadhar) मोबाईल App जारी केलं आहे. हे App तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. अशावेळी हे mAadhar मोबाईल App डाऊनलोड करुन आधारशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. या Appचा अजून एक फायदा म्हणजे आधारची एक सॉफ्ट कॉपी कायमस्वरुपी तुमच्या जवळ असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आधारची हार्ड कॉपी कायम सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही.

विविध 12 भाषांमध्ये मोबाईल App

या Appसाठी भाषेची काही अडचण नाही. कारण देशातील विविध 12 भाषांमध्ये हे App उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यात इंग्रजी भाषेचा समावेश तर आहेच. सोबतच हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगु, आणि उर्दु भाषांचा समावेश आहे. हे App डॉऊनलोड केल्यानंतर यूजरला त्याच्या भाषेबद्दल विचारलं जाईल आणि त्यानंतर त्या भाषेत संपूर्ण काम केलं जाईल.

Appवर अनेक सुविधा

mAadhar या App द्वारे तुम्ही आधार कॉपी डाऊनलोड करणे, री-प्रिंटसाठी ऑर्डर करणे, ऑफलाई ई केवायसी डाऊनलोड, क्यूआर कोड दाखवणे किंवा स्कॅन करणे, आधारचं व्हेरिफिकेशन, मेल किंवा ईमेलचं व्हेरिफिकेशन, यूआयडी किंवा ईआयडी मिळवणे आणि एड्रेस व्हॅलिडेशन लेटरसाठी विनंती पाठवण्यासारख्या अनेक कामांचा त्यात समावेश आहे. आधारशी निगडीत ऑनलाईन रिक्वेस्टलाही तुम्ही या माध्यमातून तपासू शकता.

संबंधित बातम्या :

आधार कार्डला पॅन लिंक केलात का? नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!

आता तुम्ही सुरु करु शकता आधार कार्ड सेंटर; पैसे कमावण्याचा हमखास मार्ग

Many services related to Aadhaar are available to you through the mobile app mAadhar

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.