AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थाटामाटात केलं लग्न पण सासरी पोहोचलीच नाही वधू, भररस्त्यात काय घडलं ?

आझमगढमध्ये एका वधूने लग्नाच्या नावाखाली वराची फसवणूक केली. धूमधडाक्यात लग्न झाल्यावर, वधू आणि तिच्या साथीदारांनी दागिने, रोख रक्कम घेऊन वराला भररस्त्यात सोडून पळ काढला. पोलिसांनी वेगाने तपास करत 'लुटेरी वधू' गँगमधील सात जणांना अटक केली, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेने विवाह फसवणुकीच्या प्रकारांवर पुन्हा प्रकाश टाकला आहे.

थाटामाटात केलं लग्न पण सासरी पोहोचलीच नाही वधू, भररस्त्यात काय घडलं ?
| Updated on: Sep 12, 2026 | 3:00 PM
Share

लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास क्षण. आपल्या जोडीदारासोबत संसाराची, भावी आयुष्याची स्वप्न रंगवली जातात. पण याच लग्नातून विश्वासघात मिळाला तर ? उत्तर प्रदेशच्या आझमगडमधून असाच एका धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. तिथे एका इसमाचं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं, वधूसोबत तो अगदी खुस होता. पण थाटामाटात लग्न होऊनही ती नववधू काही तिच्या सासरी पोहोचलीच नाही. उलट तिच्यासोबत आलेल्या काही लोकांनी भररस्त्यात त्या वराला गाडीतून उतरवलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर सर्वांनी लग्नात मिळालेले दागिने, रोख रक्क आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन तिथून पोबारा केला. यामुळे वरपक्षाला मोठा धक्का बसला. अखेर त्यांनी कशीबशी हिंमत गोळा करत पोलिस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लुटेऱ्या वधूच्या या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत वेगाने तपासाची चक्रं फिरवली आणि लुटेऱ्या वधू गँगमधील 2 महिलांसह एकूण सात जणांना बेड्या ठोकत अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, लुटेरी वधू गँगच्या चतुर आरोपींनी हरदोई जिल्ह्यातील बिलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छिबरामऊ गावातील रहिवासी राजकुमार याला जाळ्यात अडकवलं. तुझं लग्न लावून देऊ असं आश्वासन त्यांनी राजकुमारला दिलं. एवढंच नव्हे तर त्याला व्हॉट्सॲपवर मुलीचा फोटोही पाठवण्यात आला.

धूम-धडाक्यात, पारंपारिक रितींप्रमाणे झालं लग्न

राजकुमार आणि त्याच्या कुटुंबियांना ती मुलगी पसंत पडली आणि अखेर त्यांच लग्न ठरलं. बरदहच्या महादेवाच्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी वधू आणि वरपक्षाचे लोक त्या मंदिरात पोहोचले. तिथे राजकुमरा यांचं त्या मुलीशी अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न पार पडलं.

वरपक्षाकडून देण्यात आल्या या गोष्टी

लग्नावेळी वरपक्षाकडून वधूला सोन्याचे दागिने, 80 हजारांची रोख रक्कम आणि कपडे वगैरे देण्यात आले. लग्नानंतर राजकुमार हा वधूसोबत घराच्या दिशेने निघाला. मात्र याच दरम्यान बंधवा वळणाजवळ वधूचे कथित पिता आणि इतर कुटुंबियांनी गाडी थांबवून वराला कारमधून खाली उतरवलं. त्यानंतर वधू आणि लग्नात दिलेलं इतर सर्व सामान घेऊन ते सगळे फरार झाले. याप्रकरणी वरपित्याने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कसून तपास करत पोलिसांनी शुक्रवारी कोदहरा जवळ या फसवणुकीत सहभागी झालेल्या दोन महिला आणि सात लोकांना अटक केली. आरोपींकडून 19,650 रुपयांची रोख रक्कम, मंगळसूत, कानातलं, साड्या, कपडे, दोन बाईक्स आणि अन्य सामान जप्त करण्यात आलं.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार