MCD Election Result | दिल्लीचं तख्त कुणाला मिळणार? महापालिका निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू.. वाचा Updates!

2017 मध्ये भाजपासमोर आपचा पराभव झाला होता. यावेळी भाजपाचा दबदबा कायम राहतो की काँग्रेस आणि आपमुळे मतांवर मोठा परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

MCD Election Result | दिल्लीचं तख्त कुणाला मिळणार? महापालिका निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू.. वाचा Updates!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 9:58 AM

नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणूक (Municipal corporation of Delhi) अर्थात MCD ची मतमोजणी (Vote counting) सुरु झाली आहे. 250 जागांसाठी 1,349 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला पुढच्या काही तासात होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळी आठ वाजेपासूनच दिल्लीतील 42 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु झाली आहे. सर्व वॉर्डांमधील मतमोजणीच्या 5 ते 10 फेऱ्या होतील.

दुपारी बारा वाजेपर्यंत दिल्लीतील मतमोजणीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीचे सर्व अपडेट्स इथे पहा- क्लिक करा….

Delhi MCD Election Result 2022 LIVE: दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, वाचा एका क्लिकवर…

15 वर्षांपासून भाजपची सत्ता

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजय मिळवला असला तरीही महापालिका निवडणुकांमध्ये अजूनही भाजपचा दबदबा कायम आहे. मागील 15 वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे.

या निवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुकांसाठी झालेल्या 11  निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने आतापर्यंत तीन वेळा विजय मिळवलाय.

महत्त्वाचे 50 वॉर्ड..

दिल्लीच्या महापालिका निवडणुकांमध्ये  50 वॉर्डांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महापालिकेत महत्त्वाची पदं भूषवलेले लोक यंदा आपापल्या वॉर्डांतून नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. तर दिल्ली सरकारमधील मंत्री आणि सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या वॉर्डांवरही सर्वांचं लक्ष आहे. दिल्लीचा तख्त राखण्यात कोण बाजी मारतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

पहिली निवडणूक कधी?

दिल्ली महापालिकेची पहिली निवडणूक 1958 मध्ये झाली होती. तेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. आम आदमी पार्टी यंदा दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे. 2017 मध्ये भाजपासमोर आपचा पराभव झाला होता. यावेळी भाजपाचा दबदबा कायम राहतो की काँग्रेस आणि आपमुळे मतांवर मोठा परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळी 10वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार-

175 वॉर्डच्या मतमोजणीमध्ये भाजप 106 जागांवर आघाडीवर दिसून आली. आपचे 59 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.