AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकला जन्माची अद्दल घडवणाऱ्या ब्रह्मोसला मेगा ऑर्डर! वायुसेना आणि नौसेनेची मोठी तयारी, येथे तैनाती

भारतने ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलची ताकत दाखविली आहे, या मिसाईलने पाकिस्तानी सैन्य आणि अतिरेकी अड्ड्यांना अचूक वेधत त्याचे प्रचंड नुकसान केले होते.

पाकला जन्माची अद्दल घडवणाऱ्या ब्रह्मोसला मेगा ऑर्डर! वायुसेना आणि नौसेनेची मोठी तयारी, येथे तैनाती
brahmos missile order
| Updated on: Aug 05, 2025 | 6:57 PM
Share

भारताने अलिकडेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुझ मिसाईलने पाकच्या नाकीनऊ आणले. या ऑपरेशनमध्ये पाकच्या नऊ अतिरेकी अड्ड्यांवर अचूक हल्ला करुन ते नष्ट करण्यात या मिसाईलनी मोठी कामगिरी केली. चार दिवसाच्या या संघर्षात ब्रह्मोसची ताकद आणि अचूकता याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. हे मिसाईल भारत आणि रशियाने एकत्र येऊन तयार केले आहे.त्यामुळे त्याचे नाव ब्रह्मपुत्र आणि मॉस्कोवा नद्यांवरुन ब्रह्मोस असे ठेवण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र त्याच्या सुपरसॉनिक वेग आणि 800 किमी पल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.

भारतीय सेना आणि नौसेनेची मेगा ऑर्डर

सिंदूर ऑपरेशनच्या मोठ्या यशानंतर भारतीय वायूसेना आणि नौसेने ब्रह्मोस मिसाईलची मोठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.नौसेने आपल्या वीर-श्रेणी ( Veer-class ) युद्धनौकांसाठी आणि वायू सेना सुखोई-30 MKI लढाऊ विमानांसाठी या मिसाईलचा वापर करणार आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या बातमीनुसार संरक्षण मंत्रालय लवकरच एक उच्च स्तरीय बैठकीत या मिसाईलच्या खरेदीला मंजूरी देऊ शकते. यामुळे भारताचे संरक्षण क्षमता आणखीन मजबूत होणार आहे.

ब्रह्मोसची खासियत

ब्रह्मोस मिसाईल त्याच्या सुपरसॉनिक वेग ( मॅक 2.8) आणि अचूक लक्ष्यभेदासाठी ओळखली जाते. ही जमीन, समुद्र आणि हवेतून लाँच केली जाऊ शकते. आधी याची रेंज 290 किमी होती. त्यास अपग्रेड करुन आता 800 किमी करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर भारतची ताकत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी शस्रास्रांची स्तूती केली होती. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जगाने भारताच्या स्वदेशी शस्रास्रांची क्षमता पाहीली आहे. आमची वायू संरक्षण प्रणाली, मिसाईल आणि ड्रोनने आत्मनिर्भर भारताची ताकद सिद्ध केली आहे. ब्रह्मोसला फिलीपाईन्स सारख्या देशाला निर्यात केले जात आहे. या क्षेपणास्राने ना केवळ भारताचे संरक्षण आणखी मजबूत केले आहे, तर क्षेत्रीय स्थिरतेतही योगदान दिले आहे.

ब्राह्मोस सुपरसॉनिक मिसाइल

ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल गेम चेंजर सिद्ध झाले आहे.भारताने जेव्हा या क्षेपणास्रांना सुखोई-30MKI आणि नौसेनेच्या प्लॅटफॉर्मवर वापर केला होता तेव्हा पाकिस्तान काही तासांत गुडघ्यावर आला होता. या मिसाईलने भारताने पाकिस्तानच्या सर्व एअर डिफेन्ससह रडार स्टेशन, अवॉक्स आणि एअर बेसना उद्धवस्त केले होते. यानंतर पाकस्तान बचावात्मक स्थितीत आला. या प्रकारे ब्रह्मोस मिसाईलनी पाकिस्तानी डिफेन्सला काही तासांत पंगू केले.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.