AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण

MEIL: भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देतानाच ‘स्वच्छ ऊर्जा मोहिमे’त हे महत्त्वाचे योगदान मानता येईल.

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण
MEILImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 06, 2026 | 5:17 PM
Share

मुंबई 6 जुलै 2026: मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने कर्नाटकातील कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट्स ५ आणि ६ साठी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) निर्मीतीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने NPCIL च्या इतिहासातील सर्वात मोठे विनाखंड काँक्रीट ओतण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.

या कामात तब्बल ७,२५० घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर विनाखंड काँक्रीट ओतणे हे MEIL उभारत असलेल्या खाजगी सहभागातील भारताच्या पहिल्याच अणुऊर्जा प्रकल्पासाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. यामुळे कंपनीची अभियांत्रिकी क्षमता, नियोजन आणि अंमलबजावणीतील कौशल्य अधोरेखित झाले आहे.

प्रतिकूल हवामान, मुसळधार पाऊस आणि दुर्गम ठिकाण असूनही MEIL ने अत्याधुनिक तंत्रज्ञान, तापमान-नियंत्रित काँक्रीट उत्पादन, बर्फ निर्मिती व साठवण क्षमता, तसेच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची उपलब्धता ठेउन हे काम कोणताही खंड न पाडता पूर्ण केले. या कामासाठी शेकडो अभियंते, तंत्रज्ञ, सुरक्षा कर्मचारी आणि कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आणि गुणवत्ता तपासण्या पूर्ण करून हे काम यशस्वी करण्यात आले.

भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देतानाच ‘स्वच्छ ऊर्जा मोहिमे’त हे महत्त्वाचे योगदान मानता येईल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा