AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MEIL ला NPCIL कडून 12,800 कोटींच्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी खरेदी आदेश

मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ला नुकताच न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) कडून 12,800 कोटींच्या EPC करारासाठी अधिकृत खरेदी आदेश प्राप्त झाला आहे.

MEIL ला NPCIL कडून 12,800 कोटींच्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी खरेदी आदेश
MEIL Receives Purchase Order from NPCILImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 4:24 PM
Share

मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ला नुकताच न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) कडून 12,800 कोटींच्या EPC करारासाठी अधिकृत खरेदी आदेश प्राप्त झाला आहे. या कराराअंतर्गत कर्नाटकमधील कैगा युनिट्स 5 आणि 6 – प्रत्येकी 700 MWe क्षमतेचे दोन अणुऊर्जा रिऍक्टर्स बांधण्यात येणार असून हा गौरवाचा आणि मैलाचा दगड ठरणारा क्षण आहे.

NPCIL ने आजवर दिलेला हा सर्वात मोठा ऑर्डर असून MEIL साठी अणुऊर्जा क्षेत्रातला हा पहिलाच मोठा टप्पा आहे. भारताच्या ऊर्जा भविष्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा टप्पा आहे. NPCIL च्या मुंबई येथील मुख्यालयात हा ऑर्डर MEIL चे प्रकल्प संचालक श्री. च. पी. सुब्बय्या आणि त्यांच्या टीमला औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आला. हा केवळ व्यावसायिक यशाचा क्षण नव्हता, तर गौरव, मान्यता आणि जबाबदारीची जाणीव असलेला एक विशेष प्रसंग होता.

या प्रकल्पासाठी NPCIL ने प्रथमच गुणवत्ता आणि खर्च यांचा समतोल साधणारी QCBS (Quality-cum-Cost-Based Selection) पद्धत वापरली. BHEL आणि L&T सारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करत MEIL ने आपली मजबूत तांत्रिक मांडणी आणि स्पर्धात्मक किंमत यांच्या जोरावर निवड मिळवली.

हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकी पुरता मर्यादित नाही, तर तो स्वयंपूर्ण भारताच्या उभारणीत दिलेलं एक महत्त्वाचं योगदान आहे. MEIL साठी हा अणुऊर्जा क्षेत्रातील प्रवेश एक अर्थपूर्ण पाऊल असून, भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजांसाठी तो एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. MEIL च्या नेतृत्वाने आपल्या टीमवर विश्वास दर्शवत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली असून सुरक्षेचे, गुणवत्तेचे आणि काळजीचे सर्वोच्च निकष पाळले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

भारत आणि परदेशात अनेक मोठ्या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या MEIL साठी हा अणुऊर्जा क्षेत्रातील प्रवेश एक नवीन अध्याय आहे, जो कंपनीच्या भारताच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या भूमिकेला अधिक बळकटी देणार आहे.

MEIL (मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) बद्दल:

MEIL ही भारतातील आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी असून ती ऊर्जा, पाणी, हायड्रोकार्बन, सिंचन, तेल आणि रिग्स, संरक्षण, वाहतूक, संकुचित वायू वितरण, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि आता अणुऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. व्यावहारिक दृष्टिकोन, मजबूत कार्यान्वयन आणि दूरदृष्टी असलेल्या MEIL कडून भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलं जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.