AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MEIL ला कुवेतमध्ये मिळाले 225.5 दशलक्ष डॉलर्स महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम

मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने कुवेत ऑइल कंपनी (KOC) कडून 225.5 दशलक्ष डॉलर्सचा महत्त्वपूर्ण प्रकल्प जिंकला आहे. या प्रकल्पात पश्चिम कुवेतमधील तेलक्षेत्रात गॅस स्वीटनिंग आणि सल्फर रिकव्हरी फॅसिलिटी (NGSF) ची रचना, बांधकाम, संचालन आणि देखभाल केली जाईल. यामुळे MEIL ची मध्य पूर्वेतील उपस्थिती अधिक बळकट झाली असून, भारतीय कंपन्यांच्या जागतिक यशाला नवी दिशा मिळाली आहे.

MEIL ला  कुवेतमध्ये मिळाले 225.5 दशलक्ष डॉलर्स महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम
| Updated on: Oct 17, 2025 | 8:10 AM
Share

भारतीय पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. कुवेत ऑइल कंपनी (KOC) कडून 225.5 दशलक्ष डॉलर्स (KWD 69.23 दशलक्ष) किमतीचे काम MEIL ला मिळाले आहे.

या प्रकल्पांतर्गत पश्चिम कुवेतमधील तेलक्षेत्रांमध्ये गॅस स्वीटनिंग आणि सल्फर रिकव्हरी फॅसिलिटी (NGSF) ची रचना, बांधकाम, संचालन आणि देखभाल केली जाणार आहे. हा प्रकल्प बिल्ड-ओन-ऑपरेट (BOO) तत्त्वावर राबविला जाणार असून, KOC ला या सुविधा परत विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

भारतीय कंपन्यांची आंतराष्ट्रीय घौडदौड

ही सुविधा 790 दिवसांत पूर्ण केली जाईल, त्यानंतर पाच वर्षांसाठी तिचे संचालन आणि देखभाल MEIL करेल. शुद्ध केलेला वायू निर्जलीकरण करून मीना अहमदी रिफायनरी येथील LPG प्लांटमध्ये पाठवला जाईल. हा प्रकल्प कुवेतच्या स्वच्छ इंधन उत्पादन आणि पर्यावरणीय सुरक्षिततेच्या धोरणांच्या मानकांचे पालन करणारा असणार आहे.

या करारामुळे MEIL ने मध्य पूर्वेतील तेल आणि वायू क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. राजस्थान आणि मंगोल रिफायनरीसाठी SRU प्रकल्प राबवून MEIL ने हायड्रोकार्बन क्षेत्रातील आपली कौशल्य सिद्ध केले आहे. MEIL समृह मंगोलिया, टांझानिया, आणि इतर देशांमध्ये पिण्याचे पाणी, ऊर्जा आणि हायड्रोकार्बन क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे काम करत आहे. अशा प्रकल्पांमुळे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.