मंत्री नित्यानंद गोंड यांच्या हस्ते चौथ्या आदि कर्मयोगी प्रादेशिक प्रक्रिया प्रयोगशाळेचं उद्घाटन
सर्वसमावेशक विकास आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पुरवण्याच्या दिशेनं आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडलं आहे. चौथ्या आदि कर्मयोगी प्रादेशिक प्रक्रिया प्रयोगशाळेचं (RPL)उद्घाटन आज भुवनेश्वर येथे पार पडलं

सर्वसमावेशक विकास आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पुरवण्याच्या दिशेनं आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडलं आहे. चौथ्या आदि कर्मयोगी प्रादेशिक प्रक्रिया प्रयोगशाळेचं (RPL)उद्घाटन आज भुवनेश्वर येथील हॉटेल प्रेसिडेन्सीमध्ये पार पडलं. धर्ती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत (DAJGUA) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना लोक केंद्रित प्रशासन चालविण्यासाठी साधनं उपलब्ध करून देणं तसेच त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणं हा आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ओडिशा सरकारचे अनुसूचित जाती, अनुसूचित जामाती विकास व अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नित्यानंद गोंड यांच्या हस्ते या प्रादेशिक प्रक्रिया प्रयोगशाळेचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमाला ओडिशा सरकारचे मुख्य सचिव मनोज आहुजा, भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनीष ठाकूर,आदिवासी आणि अनुसूचित जाती विकास विभागाचे आयुक्त-सह-सचिव बी. परमेश्वरन, ओडिशा सरकारच्या अनुसूचित जमाती विभागाच्या संचालक मानसी निंभल आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या संचालक समिधा सिंह यांची उपस्थिती होती.
हा आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. ज्याद्वारे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावर आदिवासी कार्यकर्त्यांचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग तसेच क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी
आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालविकास, ग्रामीण विकास, जलशक्ती आणि वन यासारख्या महत्त्वांच्या विभागांमध्ये परस्पर समन्वय वाढवण्यावर भर
सहभागातून शिक्षण आणि सामुदायिक सहभागावर जोर
पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन यंत्रणा, या सारखे उद्देश देखील यातून साध्य होणार आहेत.
दरम्यान या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री नित्यानंद गोंड यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणातून, प्रत्येक आदिवासी घरापर्यंत मूलभूत सेवा सुविधा पोहोचल्या पाहिजेत, आणि त्यासाठीच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानासोबत जे लोक जोडले गेले आहेत त्यांनी या अभियानाचं ध्येय जिल्हा, तालुका आणि गावस्थरापर्यंत पोहोचवले पाहिजे.
