‘तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार भाजपचा संपर्कात’, मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा दावा; निष्पक्ष निवडणूक झाली तर भाजपच्या विजयाचा दावा

मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा दावा केलाय. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे तब्बल 38 आमदार (TMC MLA) भाजपच्या संपर्कात आहेत, त्यातील 21 आमदार हे थेट आपल्या संपर्कात आहेत.

'तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार भाजपचा संपर्कात', मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा दावा; निष्पक्ष निवडणूक झाली तर भाजपच्या विजयाचा दावा
मिथून चक्रवर्ती, भाजप नेते, पश्चिम बंगाल
Image Credit source: ANI
हिरा ढाकणे

| Edited By: सागर जोशी

Jul 27, 2022 | 6:21 PM

कोलकाता : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी दावा केलाय की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) तब्बल 38 आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. बंगालच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी पहिल्यांदाच भाजप आमदारांची बैठक घेतली. भाजप आमदारांच्या बैठकीनंतर मिथुन चक्रवर्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठा दावा केलाय. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे तब्बल 38 आमदार (TMC MLA) भाजपच्या संपर्कात आहेत, त्यातील 21 आमदार हे थेट आपल्या संपर्कात आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसवर अजून एक गंभीर आरोप केलाय. चक्रवर्ती म्हणाले की 2021 ची विधानसभा निवडणूक दबाव तंत्राने तृणमूल काँग्रेसने जिंकली. त्यांनी हिंदीतील एका म्हणीचा वापर करत जबरदस्तीने मिळवलेल्या गोष्टी टीकवणं अवघड असतं आणि निवडणूक दबावतंत्राचा वापर करुन जिंकली आहे. जर पुन्हा निष्पक्ष निवडणूक झाली तर भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

’18 राज्यात भाजपचं सरकार, अजून 4 राज्यात सत्ता येणार’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 ला भाजप सरकार येणार नसल्याचा दावा केलाय. त्यावर मिथून चक्रवती यांनी पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर येईल असं म्हटलंय. चक्रवर्ती म्हणाले की, 18 राज्यात भाजपचं सरकार आहे आणि अजून 4 राज्यात सत्ता येणार आहे.

भाजप विरोधात षडयंत्राचा आरोप

मिथुन चक्रवर्ती यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला देत तृणमूल काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होईल असं भाकीत केलंय. ते म्हणाले की, शिवसेनेसारखी अवस्था पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची होईल. जर बंगालमध्ये आता निवडणुका झाल्या तर भाजपचा विजय निश्चित आहे. आता देवच या राज्याला वाचू शकतो, असा टोलाही त्यांनी ममता बॅनर्जींना लगावलाय. भाजपविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. भाजप दंगल घडवते असता आरोप होतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, ते एक षडयंत्र असतं. भाजपला मुस्लिमविरोधी असल्याचं बोललं जातं. जर लोक भाजपला पसंत करत नसतील तर मग 18 राज्यात भाजपचं सरकार कसं? हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई सर्व भाजपला पसंत करतात. इथे खोटा प्रचार केला जात आहे, असा आरोपही चक्रवर्ती यांनी टीएमसीवर केलाय.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें