हे गाणं म्हणताना मोदी भावूक; सगळीकडे शांतता अन्… गायकही झाला रातोरात स्टार, तुम्ही ऐकलंय का हे गाणे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील एका कार्यक्रमात एक गाणे गायले पण ते गाणे गात असताना मोदी भावूक झालेले पाहायला मिळाले. तसेच मोदींना हे गाणे त्यांचे आवडीचे का आहे हे सांगितले तसेच या गाण्याच्या गायकाच्या नावाचा देखील मोदींना स्टेजवर उल्लेख केला. आणि परिणामी तो गायक चक्क रातोरात स्टार झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. पण राजकारण सोडलं तर मोंदी हे त्यांच्या फिटनेससाठी, त्यांच्या आहारासाठी, तसेच या वयातही ते स्वत:ची ज्या पद्धतीने काळजी घेतात त्यासाठी, तसेच त्यांच्या कपड्यांच्या स्टाईलसाठी देखील चर्चेत असतात. अनेकांना आपल्या भारताच्या पंतप्रधानांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असतेच. पण काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात ते ज्या गाण्याचे प्रचंड चाहते आहेत त्याबद्दस सांगितले. त्यांनी स्वत: हे गाणे गुणगुणले तसेच हे गाणं म्हणताना मोदी खूपच भावूक झालेले पाहायला मिळाले. ते कोणते गाणे होते आणि मोदींनी जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेऊयात.
कार्यक्रमात गाणे म्हणताना मोदी भावूक
बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाणे म्हटले होते. आणि तेव्हा ते एवढे भावूक झाले की त्यांनी ते गाणे त्यांच्या आईला समर्पित केले. ते गाणे होते “केहू कतानो दुलारी” आलोक पांडे गोपाळ यांनी लिहिलेले हे गाणे आहे.
आईची आठवण काढली अन्
एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या महिलांना संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी बोलताना अचानक त्यांच्या आईची आठवण काढली. त्यांच्यासाठी एक भोजपूरी गाणे गुणगुणले. “केहू कतनो दुलारी, बाकी माई ना होई…जग में बिना केहू सहाई ना होई…” हे गाणे त्यांनी गुणगुणले. हे गाणे बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गायक आलोक पांडे गोपाळ यांनी गायले आहे. मोदींनी त्यांचे नाव देखील भाषणात घेतले. तसेच त्यांचे हे सुंदर गाणे आपल्या आईला समर्पित केले. पण हे गाणे गाताना मोदी आईच्या आठवणींमुळे थोडेसे भावूक झालेले पाहायला मिळाले. तेव्हा एकदम सर्वत्र शांतता पसरली आणि काही क्षणात टाळ्यांचा कडकडात होऊ लागला.
रातोरात हा गायकही स्टार झाला
दरम्यान मोदींनी हे गाणे गुणगुणताच तसेच त्या गायकाचे नाव सांगताच सोशल मीडियावर रातोरात हा गायक स्टार झाला. मोदींच्या भाषणानंतर, लोकांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आलोक पांडे गोपाळ यांची गाणी मोठ्या प्रमाणात शेअर केली. तसेच, युजर्सनी देखील त्या गाण्यासाठी आणि आलोक यांच्यासाठी भरभरून कमेंट्स केल्या तसेच त्यांचे कौतुकही केले.
‘तो माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे’
तसेच जेव्हा ही बातमी आलोक पांडे गोपाळ यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी मोदींचे आभार मानले. त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, “मी हे गाणे माझ्या आईला समर्पित केले होते. आणि जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी हे गाणे गायले, तो माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. एका रात्रीत मला जगभरातून ही ओळख मिळाली” असं म्हणत त्यांनी मोदींचे आभार मानले.
गायकाला शुभेच्छांचे फोन
एवढंच नाही तर आलोक पांडे गोपाळ यांना देशभरातून आणि परदेशातून डीएम आणि फोन कॉल्सचा पूर येऊ लागला. परदेशातूनही अभिनंदनाचा वर्षाव झाला. अमेरिका, दुबई आणि मॉरिशसमधील भोजपुरी समुदायांनी त्यांच्याशी संपर्क साधला. गायक आलोक पांडे गोपाळ म्हणाले, “मी हे गाणे माझ्या आईला समर्पित केले आहे. आज जेव्हा पंतप्रधानांनी माझे गायले तो क्षण माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारासारखा आहे. .” आता, आलोक पांडे गोपाळ हे केवळ बिहारमध्येच नव्हे तर देशभरात लोकप्रिय झाले आहे.
