AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील शहर बनवणार जगाचे आकर्षण, खगोलीय घटनांच्या अभ्यासासाठी देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतात न्यूट्रॉन तारे, कृष्णविवरे, ब्रह्मांड चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खगोलशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळा बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रयोगशाळा महाराष्ट्रात होणार आहे.

महाराष्ट्रातील शहर बनवणार जगाचे आकर्षण, खगोलीय घटनांच्या अभ्यासासाठी देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा
| Updated on: Apr 09, 2023 | 9:30 AM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शहर जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. त्यासाठी भरभरुन निधीही दिला आहे. तब्बल 2600 कोटी रुपयांच्या निधीतून या शहरात प्रयोगशाळा बनणार आहे. या प्रयोगशाळेतून ब्रह्मांडाचा शोध घेण्यात येणार आहे. जगातील अशी ही तिसरी तर देशातील ही पहिली प्रयोगशाळा असणार आहे. विश्वातील प्रलयकारी घटनांमधून पृथ्वीवर येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास यामाध्यमातून केला जाणार आहे.

काय आहे प्रकल्प

न्यूट्रॉन तारे, कृष्णविवरे, ब्रह्मांड चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खगोलशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. जगात अशा दोन वेधशाळा आहेत. एक अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील हॅनफोर्डमध्ये तर दुसरी लुईझियानामधील लिव्हिंग्स्टनमध्ये आहे. आता तिसरी भारतातील महाराष्ट्रात होत आहे. जिथे विश्वातील प्रलयकारी घटनांमधून पृथ्वीवर येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास केला जातो.

राज्यात कुठे होणार प्रयोगशाळा

मार्च 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतात अशी प्रयोगशाळा बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.ही प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये होणार आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनाने वेधशाळेसाठी २२५ हेक्टर जागा दिली. त्यानंतर प्रकल्प उभारणीसाठी केंद्राकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

अणुऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार प्रयोगासाठी सपाट जागेची गरज होती. अशी सुमारे चार किलोमीटरची पट्टी, ज्यामध्ये अडथळ्याशिवाय सरळ सपाट जागेवर लेझरने अभ्यास करता येतो. म्हणून हिंगोलीची निवड केली गेली. राजस्थानच्या उदयपूरमध्येही अशा एक जमीन दिसली होती.

अमेरिकेसोबत झाला होता करार

LIGO प्रकल्पासाठी अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि भारताच्या DAE आणि DST च्या शास्त्रज्ञांमध्ये एक करार झाला आहे. LIGO-India भारतीय उद्योगांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करेल. या वेधशाळेमुळे अवकाश विभागाची भूमिका, खाजगी क्षेत्राचा सहभाग, इस्रोच्या मोहिमांचा विस्तार आणि संशोधन, शैक्षणिक, स्टार्ट-अप आणि उद्योगांचा अधिक सहभाग सुनिश्चित करणे हा आहे.

अणुऊर्जा विभाग काम करेल

LIGO India हे अणुऊर्जा विभागामार्फत चालवले जाईल. या विभागाच्या तीन संस्था आणि UGC ची स्वायत्त संस्था त्याच्या बांधकाम आणि ऑपरेशनमध्ये सामायिक करतील.महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात १७४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरीही मिळाली आहे.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.