कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांकरिता मोदी सरकाचा मोठा निर्णय, दरमाह मिळणार 4 हजार रुपये

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निराधार बालकांना दरमाह 4 हजार रुपयांनी आर्थिक मदत मिळणार आहे.

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांकरिता मोदी सरकाचा मोठा निर्णय, दरमाह मिळणार 4 हजार रुपये
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 1:20 PM

नवी दिल्ली : कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. या निराधार बालकांना दरमाह 4 हजार रुपयांनी आर्थिक मदत मिळणार आहे. नुकतंच मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात पालक गमावलेल्या निराधार मुलांसाठी (Orphan) मोठी भेट दिली आहे. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ (PM Cares for Children) ही नवी योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांना शिष्यवृत्ती आणि आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.

पालकांच्या नसन्याने या मुलांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता यावं. यासाठी 18-23 वर्षे वयोगटातील तरुणांना दरमहा स्टायपेंड मिळेल आणि ही मुलं जेव्हा 23 वर्षांची होतील तेव्हा त्यांना 10 लाख रुपये मिळतील. यासोबतच पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून आयुष्मान हेल्थ कार्ड देखील दिले जाणार आहे. यातून या मुलांना 5 लाखांपर्यंतची उपचारांसाठी मोफत सुविधाही मिळणार आहे.

या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही अनाथ बालकांशी संवाद साधला. ‘आज मी तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून बोलत आहे. तुम्हा सर्व मुलांशी बलताना मला मनोमन आनंद होत आहे. मला याची कल्पन आहे की या कोरोनाने आपल्या सगळ्यांचं मोठं नुकसान केलंय. यात तुम्हा निरागस बालकांच्या पालकांना या कोरोनाने तुमच्यापासून हिरावून घेतलं. ही खूप मोठी हानी आहे. आपल्य पालकांविना आयुष्य जगणं किती कठीण असेल याची मला जाणीव आहे. पण अजिबात खचू नका, केंद्र सरकार पुर्णपणे आपल्या पाठिशी आहे. सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे. ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन’, ही नवी योजना तुम्हाला आर्थिक पाठबळ देईल. मला कल्पना आहे की, ही रक्कम तुम्हाला आई-वडिलांचं प्रेम देऊ शकणार नाही. पण तुमच्या उदरनिर्वाहासाठी सरकारकडून ही अल्प मदत आम्ही करत आहोत” , असं या मुलांशी बोलताना मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.