AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox : भारताता मंकीपॉक्सचा शिरकाव, केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण, एनआयव्हीकडून अधिकृत दुजोरा

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे पाच रुग्ण नोंदवले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जगात मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 22,801 झाली असून हा आजार 88 देशांमध्ये पसरला आहे.

Monkeypox : भारताता मंकीपॉक्सचा शिरकाव, केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण, एनआयव्हीकडून अधिकृत दुजोरा
मंकीपॉक्सImage Credit source: social
| Updated on: Aug 02, 2022 | 8:19 AM
Share

नवी दिल्ली :  देशात मंकीपॉक्सनं (Monkeypox) कहर माजवला आहे. भारतातील (India) पहिल्या मंकीपॉक्सच्या मृत्यूची नोंद केरळमध्ये झाली असून पुणेस्थित (Pune) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनं या घटनेला अधिकृतरीत्या दुजोरा दिला आहे. गेल्या शनिवारी केरळमधील त्रिसूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. हा तरुण 21 जुलैला संयुक्त अरब अमिरातीमधून परतला होता. त्याला 27 जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यूएईमध्येच त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. भारतात परतण्याच्या एक दिवस आधी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याने त्रिसूरमध्ये उपचार घेतले. सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे येथे पाठवण्यात आलेल्या नमुन्यातही त्याला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. यामुळे पुन्हा एकदा भारतात मंकीपॉक्सची चिंता वाढली आहे. यासाठी टास्क फोर्स देखील नेमण्यात आला आहे.

मंकीपॉक्सचे भारतात पाच रुग्ण

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे पाच रुग्ण नोंदवले गेले आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जगात मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 22,801 झाली असून हा आजार आतापर्यंत 88 देशांमध्ये पसरला आहे.

टास्क फोर्स

मंकीपॉक्सवर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. देशात मंकीपॉक्स या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं यावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृवाखाली हे टास्क फोर्स काम करणार आहे.

विमानतळावर अधिकारी तैनात

टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, औषध आणि बायोटेक खात्याच्या साचिवांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशात आतापर्यंत दिल्ली, केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणी मंकीपॉक्सचे रुग्ण सापडेलेल आहेत. रुग्णांची संख्या वाढत चालल्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला होता. विशेषत: विदेशातून येणाऱ्या लोकांत मंकीपॉक्स आढळत असल्यानं विमानतळ तसेच बंदरावर आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंकीपॉक्सच्या फैलावावर लक्ष ठेवण्याबरोबरच याच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी टास्क फोर्सकडे दिली आहे.

यूएईमध्येच त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. भारतात परतण्याच्या एक दिवस आधी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर भारताता मंकीपॉक्सची चिंता वाढली आहे. याकडे अधिक गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. या आजाराचा अटकाव करण्यासाटी प्रयत्न व्हायला हवेत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.