AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयफ्रेंडसाठी आईनेच घेतला लेकाचा जीव…. ‘त्या’ दिवशी गच्चीत नेमकं काय घडलं? मृत्यूनंतर मुलगा स्वप्नात यायचा आणि..

त्या' दिवशी गच्चीत मुलाने असं काय पाहिलं, ज्यामुळे आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव? प्रियकरासाठी असं का केलं? मृत्यूनंतर मुलगा स्वप्नात यायचा आणि... घटनेमुळे सर्वत्र खळबळ

बॉयफ्रेंडसाठी आईनेच घेतला लेकाचा जीव.... 'त्या' दिवशी गच्चीत नेमकं काय घडलं? मृत्यूनंतर मुलगा स्वप्नात यायचा आणि..
Crime
| Updated on: Jan 19, 2026 | 12:45 PM
Share

आई आपल्या मुलांसाठी सर्वकाही करते. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवते आणि मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असते. पण या आईने स्वतःच्या इच्छांसाठी अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेतला आहे. तीन वर्षांच्या मुलाने आईला तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं त्यानंतर आईने मुलाला दोन मजल्याच्या घराच्या गच्चीतून खाली फेकलं. मुलाच्या मृत्यूचं सत्या आईने सर्वांपासून लपवून ठेवलं. पण सत्य कधीतरी बाहेर येतंच… ते कोणापासून लपून राहतंच नाही. मुलगा सतत आईच्या स्वप्नात यायचा आणि घाबरवायचा… पण एक दिवस असं काही झालं, ज्यामुळे महिने स्वतः गुन्हा कबूल केला. सर्व पुरावे गोळा केले आणि पोलिसांना दिले… संबंधित घटना 28 एप्रिल 2023 मध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यातील थातीपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. त्या दिवशी नक्की काय झालं घ्या जाणून…

काय आहे घटना?

कोर्टने पुराव्याअभावी महिलेच्या प्रियकराची निर्दोष मुक्तता केली. घटना घडली तेव्हा, आरोपी महिला ज्योती राठोड तिचा बॉयफ्रेंड उदय इंदौलिया याच्यासोबत गच्चीत उपस्थित होती. याच दरम्यान ज्योती हिचा तीन वर्षांचा मुलगा सनी उर्फ जतिन गच्चीत आला आणि त्याने आईला बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. आपले विवाहबाह्य संबंध कोणाला कळू नये म्हणून, घाबरलेल्या ज्योतीने दोन मजल्याच्या घराच्या गच्चीतून मुलाला खाली ठकललं.

उंचावरून पडल्यामुळे मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृताचे वडील, पोलिस कॉन्स्टेबल ध्यान सिंग यांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं. मुलाच्या मृत्यूनंतर ज्योतीची मानसिक प्रकृती देखील खालावली. ती रात्री घाबरुन उठून बसायची. भीती तिच्या मनातच राहिली होती. नवऱ्याला वाटलं, मुलाच्या निधनामुळे पत्नीच्या आरोग्यावर परिणाम झाला असेल. पण डॉक्टरांचे उपचार सुरु असताना देखील तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

त्यानंतर महिलेने पतीला सांगितलं, माझा मुलगा सतत माझ्या स्वप्नात येतो.. तिला असं वाटलं मुलाचा आत्मा भटकत आहे. याच भीतीने महिलेने स्वतःचा गुन्हा मान्य केला आणि पोलिसांत पोहोचली. तिने सांगितल्यानुसार, मुलाने तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला गच्चीत एकत्र पाहिलं होतं. तो कोणाला सांगेल या भीतीने तिने त्याला छतावरून फेकून दिलं.

फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण.
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत.
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.