AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार नरेंद्र बिर्ला यांच्या गाडीला अपघात, जयपूर-दिल्लीला महामार्गावर कार उलटली !

दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे धाकटे भाऊ आणि राजस्थानमधील कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेंद्र बिर्ला यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात नरेंद्र बिर्ला हे गंभीर जखमी झाले आहेत. कोटाहून दिल्लीला जात असताना जयपूर-दिल्ली महामार्गावरील पलवल गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला. नरेंद्र बिर्ला यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

खासदार नरेंद्र बिर्ला यांच्या गाडीला अपघात, जयपूर-दिल्लीला महामार्गावर कार उलटली !
ओव्हरटेक करताना तरुणाचा मृत्यूImage Credit source: Google
| Updated on: Mar 22, 2023 | 8:49 PM
Share

दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे धाकटे भाऊ आणि राजस्थानमधील कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेंद्र बिर्ला यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात नरेंद्र बिर्ला हे गंभीर जखमी झाले आहेत. कोटाहून दिल्लीला जात असताना जयपूर-दिल्ली महामार्गावरील पलवल गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला. नरेंद्र बिर्ला यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोटाहून दिल्लीला जात असताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र बिर्ला हे मंगळवारी रात्री कोटा येथून आपल्या कारने दिल्लीला चालले होते. जयपूर-दिल्ली महामार्गावरील पलवल गावाजवळ नरेंद्र बिर्ला यांची कार आली असता ती उलटली. कार पलटी झाल्यानंतर मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळाकडे धावले. लोकांनी गाडीतून जखमींना बाहेर काढत नजीकच्या अरवल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची सूत्रांची माहिती

अरवाल रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी बिर्ला यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रेफर केले. कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कॅम्प ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. स्पीकर ओम बिर्ला यांच्या कॅम्प ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी नरेंद्र बिर्ला यांना दोन दिवस देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अपघाताच्या वेळी नरेंद्र बिर्ला यांच्या कारचा चालक झोपेत होता, अशी माहिती ओम बिर्ला यांच्या कॅम्प ऑफिसच्या सूत्रांनी सांगितले. मात्र नरेंद्र बिर्ला यांची गाडी कशी उलटली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चालक आणि नरेंद्र बिर्ला यांच्यासह अन्य काही लोकही प्रवास करत होते. या अपघातात नरेंद्र बिर्ला, चालक व इतर प्रवासी जखमी झाले आहेत. कार चालकासह सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.