AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हा वाद राज्यांचा, केंद्राचा नाही”; ‘या’ खासदाराचे सीमावादावर अजब वक्तव्य..

हा वाद राज्यांचा आहे, केंद्राचा नाही असं वक्तव्य खासदार ओम बिर्ला यांनी केल्यानंतर विनायक राऊत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हा वाद राज्यांचा, केंद्राचा नाही; 'या' खासदाराचे सीमावादावर अजब वक्तव्य..
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 07, 2022 | 8:24 PM
Share

नवी दिल्लीः महाराष्ट्र-कर्नाटक वाद मिठण्याची सध्या कोणतीच चिन्हं दिसून येत नाहीत. त्यामुळेच केंद्रातील भाजप असो नाही तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असो त्याबाबत ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार महाराष्ट्राबाबत बेताल वक्तव्य करून सीमावाद नेहमीच त्यांनी चिघळत ठेवला आहे. त्यामुळे आज खासदार विनायक राऊत यांनी केंद्रात हा विषय मांडताना सीमा प्रश्नाबाबत सभागृहात एकी दिसायला हवी होती काहीजण सभागृहातून उठून बाहेर गेले तर काहीजण तोंडाला कुलूप लावून बसले होते असा टोला त्यांनी विरोधकांना लगवला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह विरोधकांवर सीमावादावरून जोरादार निशाणा साधला.

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रात सीमावादाचा मुद्दा मांडताना सभागृहातीलही चित्र सांगितले. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मुजोरी आम्ही संसदेत मांडली आहे.

त्यामुळे त्या विषयावर तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची एकी दिसायला हवी होती. मात्र तसे चित्र संसदेत दिसून आले नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी खासदार ओम बिर्ला यांनी सीमावादाविषयी बोलताना म्हणाले की, हा वाद राज्यांचा आहे, केंद्राचा नाही असं वक्तव्य केल्याने विनायक राऊत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, याचे आम्हाला आश्चर्य वाटतं मात्र हा प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायला हवा अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाची धग सीमाभागात प्रचंड दिसून येत आहे. या वादामुळे बससेवा बंद झाल्या असून त्याबाबतही आता तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात गेलेल्या वाहनांची तोडफोड कन्नडडिगांकडून केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?