Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 08, 2022 | 7:51 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

आज 7 डिसेंबर. अनेक घडामोडी घडत आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणीला सुरूवात (Delhi MCD Election Result Counting) झाली आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. तसंच राज्यातही विविध घडामोडी घडत आहेत. मुंबई, पुणे नाशिकसह अन्य जिल्ह्यातही घडणाऱ्या घडामोडींकडेही आपलं लक्ष असेलच. सगळे अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Dec 2022 10:32 PM (IST)

    महाविकास आघाडीचे खासदार उद्या पुन्हा आंदोलन करणार

    नवी दिल्ली :

    महाविकास आघाडीचे खासदार उद्या पुन्हा आंदोलन करणार

    संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

    राज्यपाल हटाव मागणीसाठी खासदार आंदोलन करणार

    खासदार विनायक राऊत हे उद्या पुन्हा स्थगन प्रस्ताव मांडणार

    छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यपालांनी बदनामी केल्याप्रकरणी चर्चेसाठी खासदार राऊत स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांना देणार

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उद्या खासदार आंदोलन करणार – सूत्रांची माहिती

  • 07 Dec 2022 08:59 PM (IST)

    तुम्हाला एक बेळगावची नोटीस आली तर तुमची पॅन्ट पिवळी झाली, रामदास कदमांची राऊतांवर टीका

    मुंबई

    तुम्हाला एक बेळगावची नोटीस आली तर तुमची पॅन्ट पिवळी झाली

    मला बेळगावमध्ये अटक झाली होती तरी मी नाही घाबरतो…

    तुम्ही फक्त बोलतात पण एकनाथ शिंदे यांनी किती निर्णय घेतले हे नाही बघितलं

    शिंदे आणि फडणवीस हे सक्ख्या भावासारखे काम करतात

    आम्ही कधी घाबरलो नाही…

    आणि ते बोलत आहेत की केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार म्हणून

  • 07 Dec 2022 07:35 PM (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रानं हस्तक्षेप करावाः एकनाथ खडसे यांची मागणी

    जळगाव

    कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या सीमावादाचा प्रश्न आता चिघळला

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची टीका

    महाराष्ट्राच्या वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड

    प्रांतवाद चिघळला असून त्यात समन्वयाचा अभाव

    केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज

    हा वाद वाढला पाहिजे, असं राज्य सरकारला वाटतं

    महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडीगांनी आमच्यावर हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा

    जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ, आंदोलन करू

    मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना माफी मागायला भाग पडू

  • 07 Dec 2022 07:01 PM (IST)

    पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

    पुणे : 

    पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

    2 लाख प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली होती कारवाई

    कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना दाखल झाली होती तक्रार

    चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आला गुन्हा

    आज पोलीस विभागाकडून करण्यात आलं निलंबन

  • 07 Dec 2022 06:21 PM (IST)

    हिमाचल प्रदेशात काँग्रेसमध्ये भूंकप

    Marathi News LIVE Update हिमाचल प्रदेशात काँग्रेसमध्ये भूंकप

    काँग्रेसच्या नेत्यांची हकालपट्टी

    काँग्रेसमधून 30 नेत्यांवर कडक कारवाई

    नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी

  • 07 Dec 2022 05:44 PM (IST)

    बेळगाव विमानतळावरची स्पाईस जेटची सेवा कायमस्वरूपी बंद

    बेळगाव :

    बेळगाव विमानतळावरची स्पाईस जेटची सेवा कायमस्वरूपी बंद

    10 डिसेंबर पासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय

    स्पाईस जेट कंपनीचा मोठा निर्णय

    बेळगाव-दिल्ली, बेळगाव-बेंगलोर विमानसेवा ही कायमस्वरूपी बंद करणार

    कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांसमोर मोठं संकट

    विमानसेवा बंद करण्याचे कारण अस्पष्ट

  • 07 Dec 2022 05:41 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाने नोटाबंदी विरोधातील याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवला

    नवी दिल्ली :

    सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 2016 मध्ये नोटाबंदी चुकीच्या पद्धतीने घोषित करणाऱ्या याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवलाय.

    सर्व पक्षकारांना 2 दिवसांत लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले आहे

    केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटाबंदीच्या निर्णयाशी संबंधित प्रक्रियेची कागदपत्रे सीलबंद कव्हरमध्ये सुपूर्द करण्याची परवानगी दिलीय.

    नोट बंदी बाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे देशाचं लक्ष

  • 07 Dec 2022 04:49 PM (IST)

    काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली

    Marathi News LIVE Update काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली

    महाराष्ट्रातील वाहनांवर दगड फेक करणाऱ्यांवर कडक करावाई करणार

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झालेली आहे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

    सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली माहिती

  • 07 Dec 2022 04:45 PM (IST)

    कोल्हापुरात माविआच्या नेत्यांची बैठक

    Marathi News LIVE Update

    कोल्हापुरात माविआच्या नेत्यांची बैठक

    सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय पाटील यांची उपस्थितीत

    चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाईंना बेळगावात जायचंच नव्हतं

    कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नी बैठकीत राज्य सरकारवर आगपाखड

    मराठी भाषिकांच्या पाठीशी उभं राहण्याची रणनीती

  • 07 Dec 2022 02:11 PM (IST)

    कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक,आंदोलनाची दिशा ठरवणार

    कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्याच वेळात बैठक

    आंदोलनाची दिशा ठरवणार

    सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय पवार, विजय देवणे यांची उपस्थिती असणार

    सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी रणनीती ठरवली जाणार

    कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल घेणार ठोस निर्णय

    बैठकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तसेच सीमा वासियांचे लक्ष

  • 07 Dec 2022 01:31 PM (IST)

    केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पथक नाशिकमध्ये

    नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथक नाशिकमध्ये

    गेल्या आठवड्यात नाशिकच्या म्हसरूळ परिसरात घडली होती बलात्काराची घटना

    द्विसदसीय पथकाने केली आश्रम शाळेची पाहणी, सोबत राज्य महिला व बाल विकास आयोगाचेही सदस्य

    आश्रम शाळेच्या संचालकाने केला होता आश्रम शाळेतील ७ विद्यार्थिनींवर बलात्कार

  • 07 Dec 2022 01:24 PM (IST)

    कर्नाटकमध्ये जाण्याऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलीसांकडून कसून चौकशी

    बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र शिनोळी बॉर्डर वर महाराष्ट्र- कर्नाटक वाहतूक सुरु

    महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्याऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलीसांकडून कसून चौकशी

  • 07 Dec 2022 12:17 PM (IST)

    नाशिकच्या त्रंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला मिळणार सुरक्षा कवच 

    नाशिकच्या त्रंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला मिळणार सुरक्षा कवच

    त्रंबकेश्वर चे 97 किलोमीटर क्षेत्र 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित

    त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा देखील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र

    त्रंबकेश्वरमधील ब्रम्हगिरी परिसरात मागच्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू होतं

    प्रतिबंधित क्षेत्रात आता कोणतंही उत्खनन करता येणार नाही

  • 07 Dec 2022 12:13 PM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जय्यत तयारी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अथितिगृहात मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक होणार

    या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसदर्भात रणनिती ठरवील जाणार

    भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष येणारी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार यांचे स्पष्टं संकेत

    या युतीत आणखी कुणाला सहभागी करायचे, यावरही होणार चर्चा, अन्न मराठा संघटनांना सोबत घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस

  • 07 Dec 2022 11:35 AM (IST)

    कर्नाटक सरकारचा पुन्हा आडमुठी भूमिका, महाराष्ट्र राज्याच्या बसेस पुन्हा बंद केल्या

    कर्नाटक मध्ये गेलेल्या बस पुन्हा महाराष्ट्रात परतू लागल्या

    कर्नाटक पोलीस व परिवहन खात्याने बस बंद ठेवण्याचे दिले आदेश

    बसमधील प्रवाशांना अश्रू झाले अनावर

  • 07 Dec 2022 11:12 AM (IST)

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे औरंगाबादमध्ये पडसाद

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे औरंगाबादमध्ये पडसाद

    कर्नाटकाच्या बसला फासले काळे, भगव्या अक्षरात जय महाराष्ट्र लिहिले

    उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासले

    बस स्थानकावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली

    मध्यवर्ती बस स्थानकावर 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा देत कर्नाटकच्या बसला काळे फासले

  • 07 Dec 2022 10:53 AM (IST)

    पुन्हा एकदा होम लोनसह इतर कर्जेही महागणार; रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ

    रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ

    आता रेपो रेट 5.90 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर

    होम लोनसह सर्व प्रकारची कर्जे होणार महाग

    एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीयाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

  • 07 Dec 2022 10:51 AM (IST)

    कर्नाटकमध्ये जाण्याऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलीसांकडून कसून चौकशी

    बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र शिनोळी बॉर्डर वर महाराष्ट्र- कर्नाटक वाहतूक सुरु

    महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्याऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलीसांकडून कसून चौकशी

  • 07 Dec 2022 10:24 AM (IST)

    हवेचा वेग मंदावल्याने मुंबईची हवा झाली दिल्लीसारखी 

    प्रदूषणामध्ये होत आहे वाढ

    हवेची गुणवत्ता 326 AQI

    मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

  • 07 Dec 2022 10:23 AM (IST)

    जालन्यात आज कडकडीत बंद पाळला जाणार 

    जालन्यात आज कडकडीत बंद पाळला जाणार

    महाविकास आघाडीकडून आज जालना बंदची हाक

    राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या निषेधार्थ पुकारला बंद

    सकाळपासून जालना शहरातील अनेक दुकाने बंद

    बंदचे अवाहन करण्यासाठी रॅलीला सुरुवात

    रॅलीत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे सहभागी

    जालना शहरात कडकडीत संप पाळला जातोय

  • 07 Dec 2022 10:10 AM (IST)

    नाशिकमध्ये कर्नाटक सरकारच्या विरोधात स्वराज्य संघटनेचे आंदोलन

    कर्नाटक बँकेचे नावाला काळे फासत लिहिले जय महाराष्ट्र

    तुमच्याही गाड्यांना काचा आहेत म्हणत स्वराज्य संघटनेचा इशारा '

    कर्नाटक सरकारच्या विरोधात नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने केली जोरदार घोषणाबाजी

  • 07 Dec 2022 09:57 AM (IST)

    ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आंदोलन करण्याच्या तयारीत

    ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आंदोलन करण्याच्या तयारीत

    ठाकरे गटाचे खासदार दोन मागण्या करणार

    राज्यपालांना हटवण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार करणार

    सीमा प्रश्नाबाबत चर्चा करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार करणार

    खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार आंदोलन करणार - सूत्रांची माहिती

  • 07 Dec 2022 09:27 AM (IST)

    बेळगाव डेपो मधून महाराष्ट्राच्या निघालेल्या बसेस थांबवल्या

    बेळगाव डेपोमधून निघालेल्या महाराष्ट्राच्या बसेस थांबवल्या

    बेळगाव पोलिसांनी बसेस थांबवल्या

    प्रवाशांना फुटले रडू गोवाहूण कलकुंद्री लग्न कार्याला जाण्यासाठी आले होते

    त्यांना बेळगाव महारष्ट्र बस कर्नाटक पोलिसांनी आडवले

    बससेवा पुन्हा बंद झाली

  • 07 Dec 2022 09:25 AM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभा सभापतींना नोटीस

    सभागृहात कर्नाटक महाराष्ट्रात सीमावादावरून निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा व्हावी

    स्थगन प्रस्तावाची पाठवली नोटीस

    पहिल्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आक्रमक होणार

  • 07 Dec 2022 09:22 AM (IST)

    दिल्लीच्या महापलिका सत्तेच्या चाव्या कुणाकडे? आज स्पष्ट होणार

    राजधानी दिल्लीकडे देशाच्या नजरा

    आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर

    दिल्लीच्या महापलिका सत्तेच्या चाव्या कुणाकडे? आज स्पष्ट होणार

  • 07 Dec 2022 08:17 AM (IST)

    कोल्हापुरातून पहिली बस बेळगावच्या दिशेनं

    महाराष्ट्राने केलं धाडस! कोल्हापुरातून पहिली बस बेळगावच्या दिशेनं
    24 तासानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा झाली सुरू
    बसने सौंदतीला जाणाऱ्या भाविकांकडून समाधान व्यक्त
    निपाणी, संकेश्वर, हत्तरगीसह सर्व थांबे घेऊन बस बेळगावमध्ये पोहचणार
  • 07 Dec 2022 08:14 AM (IST)

    दिल्ली महापालिका निवडणूक, मतमोजणीला सुरूवात

    दिल्ली महापालिका निवडणूक

    महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू

    सुरुवातीला 20 हजार पोस्टल मतांची मतमोजणी होणार

    त्यानंतर इतर मतदारांच्या मतमोजणीला सुरुवात होणार

    42 ठिकाणी होणार मतमोजणी

    1349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

Published On - Dec 07,2022 8:12 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.