मुंबईतून सुटणाऱ्या ‘वंदे भारत’चा प्रवास होणार वेगवान, रेल्वेने घेतले हाती हे मिशन

vande bharat: भारतीय रेल्वेचा 'मिशन रफ्तार' प्रोजेक्टनुसार वंदे भारत ट्रेनची स्पीड 160 किमी प्रती तास करण्याची योजना आहे. या वेगाने ट्रेन चालवण्यासाठी सिस्टीमध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासाठी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षा आयुक्तालयाकडे परवानगी मागितली होती.

मुंबईतून सुटणाऱ्या 'वंदे भारत'चा प्रवास होणार वेगवान, रेल्वेने घेतले हाती हे मिशन
vande bharat
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 9:46 AM

भारतीय रेल्वेच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय कोणती ट्रेन झाली? या प्रश्नाचे उत्तर अनेकांचे ‘वंदे भारत’ असेच असणार आहे. सेमी हायस्पीड म्हटली जाणारी ही ट्रेन अद्याप आपल्या वेगानुसार धावत नाही. परंतु आता लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावणार आहे. यासंदर्भात सुरु करण्यात येणाऱ्या प्रकल्पाला रेल्वे सुरक्षा आयुक्तालाची मंजुरी मिळाली आहे. मुंबई ते अहमदाबाद वंदे भारतासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यानंतर मुंबई ते अहमदाबाद अंतर अजून कमी वेळेत गाठता येणार आहे.

सुरक्षा आयुक्तांची परवानगी

पश्चिम रेल्वेने वंदे भारतचा वेग अधिक वाढण्याचे ट्रायल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळाली आहे. सध्या मुंबई ते अहमदाबादसह सर्वच वंदे भारत एक्स्प्रेस 130 किमी प्रतीतास वेगापेक्षा अधिक वेगाने धावत नाही. आता तिचा वेग वाढवून 160 किलोमीटर प्रतीतास करण्यात येणार आहे. ही ट्रायल यशस्वी झाल्यास मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील प्रवासाचा वेळ 45 मिनटे कमी होणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी 5 तास 25 मिनिटांचा वेळ लागतो.

सिस्टीमध्ये काही सुधारणा करणार

भारतीय रेल्वेचा ‘मिशन रफ्तार’ प्रोजेक्टनुसार वंदे भारत ट्रेनची स्पीड 160 किमी प्रती तास करण्याची योजना आहे. या वेगाने ट्रेन चालवण्यासाठी सिस्टीमध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासाठी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षा आयुक्तालयाकडे परवानगी मागितली होती. त्यसाठी या मार्गावर 792 किमीपर्यंत सेफ्टी बॅरियर लावण्यात आले आहे. आता ट्रायलसाठी 16-कारची वंदे भारतचा वापर केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या स्पीड 120-130 किमी

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर 160 किमी प्रतीतास वेगाने वंदे भारत धावण्यासाठी आवश्यक असणारे काम पूर्ण केले गेले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. आता या महिन्यात त्यासाठी ट्रॉयल सुरु होणार आहे. सध्या वंदे भारत ट्रेनची स्पीड 120-130 किमी प्रतीतास आहे. मुंबई-सूरत-वडोदरा-दिल्ली आणि मुंबई-वडोदरा-अहमदाबाद सेक्टर 160 किमी प्रती तास वेगाने गाडी चालवण्यासाठी तयार आहे. या प्रकल्पावर 3,959 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...