AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला

आरोपींनी विवेकची हत्या करण्यापूर्वी त्याला दारु पिण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार तीन आरोपी आणि विवेक एकत्र भेटले आणि दारु पिण्यासाठी गेलेय तेथे गेल्यावर दोन वर्षापूर्वी लग्न समारंभात झालेल्या मारामारीवरुन निक्की आणि विवेकमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली.

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केलाImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 12:11 AM
Share

उत्तर प्रदेश : दोन वर्षापूर्वी लग्न समारंभात झालेल्या मारहाणीचा बदला (Revenge of the beating) घेण्यासाठी मित्राने मित्राची हत्या (Murder) मृतदेह गंगा कालव्यात फेकल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून खुनात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. विवेक त्यागी (34) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. (Murder of a young man to avenge a quarrel at a wedding two years ago)

मित्रांना भेटायला गेला तो परतलाच नाही

पीडित विवेक हा 3 फेब्रुवारी रोजी रात्री घरच्यांना थोडा वेळात येतो असे सांगून घरातून निघून गेला, पण तो परतलाच नाही. घरच्यांनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर घरच्यांनी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु केला. यावेळी तपास करताना हत्येच्या दिवशी गावातील अन्य तीन मुलेही गायब असल्याचे कळले. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी पीडिताच्या कुटुंबीयांनी मोहित आणि निक्की नावाच्या दोघांनी विवेक अपहरण केले असावे, अशी शंका व्यक्त केली. हे दोघेही विवेकचे मित्र आहेत. त्यानंतर सर्विलांसद्वारे पोलिसांनी हत्येच्या दिवशी पीडित आणि आरोपींचे लोकेशन एकत्र असल्याचे कळले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

जुना वाद उफाळून आला अन्

आरोपींनी विवेकची हत्या करण्यापूर्वी त्याला दारु पिण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार तीन आरोपी आणि विवेक एकत्र भेटले आणि दारु पिण्यासाठी गेलेय तेथे गेल्यावर दोन वर्षापूर्वी लग्न समारंभात झालेल्या मारामारीवरुन निक्की आणि विवेकमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली. यानंतर निक्की आपले दोन साथीदार मोहित आणि रितू त्यागी यांच्यासोबत मिळून विवेकला जबर मारहाण करीत त्याची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि पोलिस आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी आरोपींनी विवेका मोबाईल मेरठ रोडला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकला. (Murder of a young man to avenge a quarrel at a wedding two years ago)

इतर बातम्या

Nalasopara Molestation : नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

Mobile Theft : कामानिमित्त आला आणि मोबाईल लंपास करून गेला, डोंबिवलीतील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.