AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली आंदोलनावरून भाजपाच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर; दिला महत्त्वाचा सल्ला!

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागातून दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थी जमा झालेले आहेत. हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात असलेली चिंता ही रास्त आणि वास्तवाला धरून आहे, असं मत भाजपाच्या नेत्याने व्यक्त केलंय.

दिल्ली आंदोलनावरून भाजपाच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर; दिला महत्त्वाचा सल्ला!
murli manohar joshiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 10:00 PM
Share

Murli Manohar Joshi : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन सुरू आहे. नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे तसेच नीट पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांची आहे. दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षांनीदेखील हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. 20 जुलै रोजी झालेल्या संसद मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्च केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळेही संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता केंद्र सरकारने आमची सर्व मुद्द्यांवर चर्चेची तयारी आहे. परंतु सीजेपी तसेच इंडिया आघाडीने मात्र अगोदर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यानंतरच चर्चा अशी भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आत भाजपाच्याच एका ज्येष्ठ नेत्याने भाजपाला घरचा आहेर दिला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वागणुकीवर त्यांनी आक्षेप व्यक्त केलाय.

विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आक्षेप व्यक्त केलाय. तसेच विद्यार्थ्यांचे मुद्दे हे रास्त असल्याचेही परखड मत त्यांनी व्यक्त केलेय. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली, त्यावरही मुरली मनोहर जोशी यांनी दु:ख व्यक्त केलंय. या आंदोलनाकडे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातूनच पाहणे आयोग्य असल्याचेही ते म्हणाले आहेत.

मुरली मनोहर जोशी यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय आहे?

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागातून दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थी जमा झालेले आहेत. हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात असलेली चिंता ही रास्त आणि वास्तवाला धरून आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. तसेच तरुणांनी उपस्थित केलेल्या पश्नाना दूरगामी समाधानाच्या दृष्टीने सोडवले पाहिजे. बळाचा वापर करण्याच्या दृष्टीने सध्याच्या घटनेकडे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून पाहिले जाणार नाही, अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले. महिला तसेच तरुणींवरही बळाचा वापर केला गेला, हे खूपच वेदनादायी आहे. अशा बळाच्या वापरामुळे भारताचा एक मोठा हिस्सा विकसित भारताच्या लक्ष्यापासून खूप दूर जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय.

Follow Us
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...