AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराबाबत न्यायालयाच्या आदेशांचे पालन, वंतराचा खुलासा

राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट (RKTEWT) ने कोल्हापूरच्या नंदणी गावातील हत्तीण महादेवीच्या गुजरात येथील वाइल्डलाइफ केअर सेंटरमधील स्थलांतराबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. ट्रस्टने हे स्थलांतर नाही केले, तर ते न्यायालयाच्या आदेशानुसार झाले.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराबाबत न्यायालयाच्या आदेशांचे पालन, वंतराचा खुलासा
Mahadevi ElephantImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 05, 2025 | 4:15 PM
Share

कोल्हापूर जिल्ह्यातील नंदणी गावातील स्वस्तिश्री जैनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था येथून मंदिरातील हत्तीण महादेवी हिला गुजरातमधील वाइल्डलाइफ केअर सेंटरमध्ये हलवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, वंतरा आणि त्याचा एक भाग असलेल्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट (RKTEWT) ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महादेवी स्थलांतरामागील न्यायालयीन आदेश

या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, महादेवीच्या स्थलांतराची शिफारस किंवा मागणी ट्रस्टने केलेली नाही. हा निर्णय पूर्णतः न्यायालयीन आदेशांवर आधारित होता. ही शिफारस हाय पॉवर्ड कमिटीने केली होती, ज्याला १६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि २८ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची पुष्टी केली. न्यायालयाने हे स्थलांतर दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, या प्रक्रियेसंदर्भातील अनुपालन अहवालासाठी ही बाब ११ ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयात सुनावणीसाठी नोंदवण्यात आली आहे.

सार्वजनिक चर्चेच्या पार्श्वभूमीवर, RKTEWT ने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की वंतराने ही प्रक्रिया सुरू केलेली नव्हती, आणि संपूर्ण स्थलांतर न्यायालयीन निरीक्षणाखाली व संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयानेच पार पाडण्यात आलं. संस्थेने हेही मान्य केलं की महादेवीचा कोल्हापुरात एक भावनिक आणि सांस्कृतिक स्थान आहे, मात्र वंतराने केवळ न्यायालयाने नियुक्त केलेल्या रिसीव्हिंग सेंटर म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे. “या स्थलांतरामागील कारणं पूर्णतः न्यायालयीन आदेशांमध्ये नमूद आहेत आणि ती स्वतःच स्पष्ट आहेत,” असं निवेदनात नमूद केलं आहे.

वंतरा ट्रस्टची भूमिका आणि जबाबदारी

वंतराच्या पूर्वीच्या निवेदनात हे देखील नमूद केलं होतं की, महादेवीचं स्थलांतर प्रेम, जबाबदारी आणि कायदेशीर व कल्याणविषयक निकषांच्या पूर्ण पालनासह पार पाडण्यात आलं आहे. तसेच, संस्था स्वामीजींसोबत थेट आणि सन्मानपूर्वक संवाद साधत आहे, जेणेकरून तिच्या भविष्यासंदर्भात असे सर्व पर्याय समजून घेता येतील, जे तिच्या आरोग्याबरोबरच समाजाच्या भावना देखील ध्यानात घेतील.

वंतरामध्ये महादेवीला पशुवैद्य, वर्तनतज्ज्ञ आणि सेवकांकडून विशेष काळजी दिली गेली आहे. साखळ्यांपासून मुक्तता, अपूर्ण राहिलेल्या फ्रॅक्चरचं उपचार, वेदनादायक नखांवर उपचार, यासोबत मोकळं व सुरक्षित वातावरण, संतुलित आहार आणि भावनिक आधार देण्यात आला आहे, ज्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

तथापि, सध्या सुरू असलेल्या या पुनर्बलनाच्या टप्प्यावर तिचं परतीचं कोणतंही पाऊल या सुधारण्यामध्ये व्यत्यय आणू शकतं, आणि तिच्या भविष्यासंदर्भात नवीन चिंता निर्माण करू शकतं. म्हणूनच, तिच्या भविष्यासंदर्भातील कोणताही निर्णय हा – प्रेमभावना, कायदा आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींच्या आधारावरच घेतला जाणं अत्यावश्यक आहे.

दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.