नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळाची 20 वर्ष, ‘टीव्ही9 मराठी’वर धोरण-रणनीतींवर विशेष मालिका

निर्णय, धोरणं आणि रणनीतींमुळे भारताला मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली देश म्हणून जागतिक व्यासपीठावर स्थान मिळाले आहे. टीव्ही 9 मराठी या 20 वर्षांच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकणारी एक विशेष मालिका सादर करत आहे.

नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळाची 20 वर्ष, 'टीव्ही9 मराठी'वर धोरण-रणनीतींवर विशेष मालिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 6:01 PM

नवी दिल्ली : 7 ऑक्टोबर 2021 ही भारताच्या सत्तेसाठी महत्त्वाची तारीख आहे. 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. आज त्यांच्या सत्ताकाळाची 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून देशाच्या पंतप्रधानपदावर पोहोचेपर्यंतच्या काळात देशाचे चित्र आणि नशीब बदलणाऱ्या नरेंद्र मोदींच्या निर्णय, धोरणं आणि रणनीतींचा लेखाजोखा या निमित्ताने ‘टीव्ही 9 मराठी’ मांडणार आहे.

या निर्णय, धोरणं आणि रणनीतींमुळे भारताला मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली देश म्हणून जागतिक व्यासपीठावर स्थान मिळाले आहे. टीव्ही 9 मराठी या 20 वर्षांच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकणारी एक विशेष मालिका सादर करत आहे. याचा पहिला भाग गुरुवारी रात्री  9.30  वाजता प्रसारित होईल.

नेतृत्वाचा करिश्मा

आजचा भारत जगाच्या अग्रस्थानी उभा आहे आणि त्या विश्वगुरुंच्या संकल्पनेने सुसज्ज आहे, जो प्राचीन भारताची ओळख होता. ‘विश्व गुरु – Revival Of Indian Glory’ या विशेष टीव्ही मालिकेत आधी ‘महारथी – Master Of Diplomacy’ प्रसारित केले जाईल. यानंतर, ‘राष्ट्र-रक्षक Rock-Solid Intentions’, ‘फौलाद-Enemies’ Nightmare’, ‘याराना- Charismatic Leader’ आणि ‘मिसाल- Guiding The Globe’यामध्ये पंतप्रधान मोदींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे सखोल विश्लेषण प्रकट करतील.

दिल्लीपर्यंत पसंती

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि ते सलग मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होते. या दरम्यान, त्यांचे अनेक निर्णय आणि स्पष्टवक्तेपणाने वेगळी छाप सोडली, ज्यामुळे मोदींना दिल्लीपर्यंत पसंत केले जाऊ लागले.

दोन वेळा बहुमत

त्यांच्या लोकप्रियतेमुळे 2013 मध्ये पंतप्रधान मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार केले होते. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवले आणि नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी मागील वेळेपेक्षा अधिक जागांसह पुन्हा पूर्ण बहुमत आणून पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गेली 7 वर्षे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधानपद सांभाळत आहेत.

पंतप्रधान मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे झाला. ते लहान वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) सामील झाले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आणि सरचिटणीसपदही भूषवले.

संबंधित बातम्या :

Special Report | मुख्यमंत्री ते यशस्वी पंतप्रधान…, मोदींची 20 वर्षांची राजकीय कारकीर्द

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं नवं मिशन, आता देशातील शहरं कचरामुक्त करण्याचा संकल्प

Non Stop LIVE Update
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.