AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकट, भूस्खलनाने रस्ता बंद, शेकडो भाविक अडकले

उत्तराखंडातील रुद्रप्रायग जिल्ह्यात दरड कोसळणे आणि अतिवृष्टीने संकट ओढवले आहे. दरडींमुळे केदारनाथ यात्रेचा मार्ग बाधित झाला आहे.

केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकट, भूस्खलनाने रस्ता बंद, शेकडो भाविक अडकले
kedarnath yatra
| Updated on: Jul 26, 2025 | 3:39 PM
Share

उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली आहे. येथे पर्वतांवरुन लागोपाठ माती आणि दगडाची घसरण होत आहे. त्यामुळे हा मार्ग संपूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करुन सध्या केदारनाथ यांची यात्रेला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित स्थानांवरच थांबवण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकांना महत्वांच्या जागांवर तैनात करण्यात आले आहे. हवामान विभागाने येत्या 48 तासांत मोठा पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होऊ शकते असे म्हटले जात आहे.

केदारनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांना आवाहन केले आहे की त्यांनी घाबरु नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. प्रशासनाने भाविकांची सुरक्षा करता यावी यासाठी गौरीकुंड आणि सोनप्रयाग या ठिकाणी भाविकांना थांबवले आहे.

प्रतिकूल हवामानाचे संकट

केदारनात यात्रेला दरवर्षी लाखो श्रद्धाळूंना आकर्षित करत असते. परंतू पर्वतांचा क्षेत्रात प्रतिकूल हवामानाच्या माऱ्याने नेहमीच ही यात्रा प्रभावित होत असते. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार स्थितीवर नजर ठेवून असून रस्त्या मोकळा होता ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.