AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कु तुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगत आहे कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे.

वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा
ओबीसी आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही, न्यायाचा अधिकार मिळालाच पाहिजे-शरद पवार
| Updated on: May 25, 2022 | 9:08 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद-मंदिर वाद (Gyanvapi mosque-temple dispute) गाजत आहे. मशीद मंदिराच्या विषयामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. नेमकं याच वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आपले आता स्पष्ट मत मांडले आहे. हे मत मांडत असताना त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही, पण काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव संपवण्यासाठी भाजपचं धोरण आहे.

महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचा विचार-विचारसरणी वेगळी

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपवर टीका केली. अयोध्या प्रकरण निकाली निघाल्यानंतर देशात शांतता नांदणार असं आम्हाला नेहमीच वाटत आले होते, मात्र भाजपचा विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशा प्रकारच्या धार्मिक विषयांना घेऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

देशात जातीय वातावरण

ज्ञानवापी प्रकरणावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की,वाराणसीत मंदिर आहे. मंदिराला कुणाचा विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. मात्र आता भाजप हिंदू मुस्लीम हा वाद नव्याने उखरुन काढत आहे.

ताजमहाल आमचा आहे

अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यावर देशासोबतच जगभरातील लोकही अभिमान बाळगतात. ताजमहालसारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहाल आमचा आहे. आमच्या पूर्वजांनी ते बनवले.

कुतुबमिनार कोणी बांधला जगाला माहीतय

दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कु तुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगत आहे कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी, सांप्रादायिक विचारांना चालना दिली जात असल्याचे मत शरद पवार यांनी मांडले.

…हाच त्यांचा अजेंडा

मोदी सरकार आणि भाजप आज देश चालवत आहे. एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणत आहेत, हाच त्यांचा अजेंडा आहे. काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे हेच भाजपचं धोरण असल्याची टीका पवारांनी केली.

महिलांना घर चालवणं कठीण झाले

महागाईमुळे आज देशातील महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे. मात्र महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणताही निर्णय घेत नाही. त्यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.