AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA चा उदारमतवादी हिंदू चेहरा, आज NDA ला हवा होता, सत्तेचं गणित झालं असतं सोपं

आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगूल अजून वाजलेलं नाहीय. पण हे बिगूल वाजण्याआधी देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. विरोधी पक्षांच्या गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. तर भाजपच्या गोटातही रणनीती आखली जात असल्याची माहिती मिळत आहे.

INDIA चा उदारमतवादी हिंदू चेहरा, आज NDA ला हवा होता, सत्तेचं गणित झालं असतं सोपं
| Updated on: Jul 29, 2023 | 8:34 PM
Share

मुंबई | 29 जुलै 2023 : देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. विरोधी पक्षांच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील भाजप विरोधातील अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष एकत्र आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. भाजपला सत्तेतून पायउतार करणं हेच या पक्षांचं ध्येय आहे. विरोधील पक्षांच्या या आघाडीला ‘इंडिया’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. आता तिसरी बैठक ही मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.

विरोधी पक्षांच्या गोटातील या हालचाली पाहता काही दिवसांपूर्वी भाजपकडूनही एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए आघाडीतील जवळपास 30 ते 35 पक्षांच्या नेत्यांना संबोधित केलं होतं. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

भाजपला एका उदारमतवादी हिंदू चेहऱ्याची धास्ती?

एनडीएच्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे. ती म्हणजे भाजपला विरोधी पक्षांमधील एका हिंदुत्ववादी चेहऱ्याची जास्त धास्ती बसलेली आहे. कारण हा हिंदुत्ववादी चेहरा आजच्या घडीला सर्वसमावेश अशी भूमिका घेताना दिसतोय. हा नेता भाजपला न घाबरता भिडणारा आहे.

या नेत्याची उदारमतवादी हिंदूत्वाची भूमिका भाजप आणि एकंदरीत एनडीला चिंता वाढवणारी आहे. कारण देशातील अनेक सुशिक्षित हिंदू असं उदारमतवादी भूमिकेचं स्वागत करु शकता. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे या सर्व विविधतेचं स्वागत करुन आपला धर्म, भाषा, प्रांत जपणं ही काळाजी गरज बनली आहे.

याशिवाय फक्त एकच भूमिका घेऊन पुढे जाता येणार नाही. जास्त कट्टरता योग्य नसते. सर्वसमावेशक गोष्टीचं नेहमी स्वागत असतं. त्यामुळे या हिंदुत्ववादी चेहऱ्याचं देशात स्वागत होऊ शकतं. विशेष म्हणजे संपूर्ण देशात या चेहऱ्याबद्दल आस्था निर्माण झालेली आहे.

‘तो’ उदारमतवाही हिंदुत्व चेहरा कोणता?

गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे या नेत्याप्रती सहानुभूती आणि प्रेम जनमाणसांमध्ये निर्माण झालंय. विशेष म्हणजे हा नेता महाराष्ट्रातला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समजा निवडणूक झाली तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो, असा अहवाल देखील काही संस्थांच्या सर्वेक्षणातून समोर आल्याची चर्चा होती. आम्ही ज्या नेत्याविषयी बोलतोय हा नेता दुसरा-तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत, अशी चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत गेल्या वर्षभरात जे घडलंय ते सर्वांना माहीत आहे. खरंतर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्यक्ष घडामोडींना सुरुवात झाली. त्याआधीदेखीस भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेचे मंत्री हे खिशात राजीनामा घेऊन फिरत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर निकाल समोर आले तेव्हा प्रत्यक्ष युती तुटली.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन केलं. पण हे सरकार फक्त अडीच वर्ष टिकलं. शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठं पुकारलं. हे बंड शिवसेनेच्या 40 आमदारांना उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर घेऊन गेलं.

उद्धव ठाकरे यांची आपल्याच माणसांसोबत लढाई

उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही खूप मोठी लढाई बनली. आपल्याच माणसांविरोधात उद्धव ठाकरे यांना उभं राहावं लागलं. या लढाईत त्यांच्या हातून फक्त सत्ता गेली नाही, तर पक्षाची प्रचंड वाताहत झाली. त्यांच्याकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं. याशिवाय पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.

उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दलची भूमिका नेमकी काय?

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादाबाबत आपली भूमिका अनेकदा बोलून दाखवली. आपण आपला धर्म घरात ठेवायला हवा. घराबाहेर पडतो तेव्हा आपण भारतीय म्हणून वावरायला हवं. पण घराबाहेर कुणी आपल्याला त्याच्या धर्माची मस्ती दाखवत असेल आणि डिवचत असेल तर त्याला खरं हिंदुत्व काय असतं ते दाखवून द्यायचं, अशी सर्वसमावेश हिंदुत्वाची भूमिका त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे.

त्यामुळेच त्यांचं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह देशभरातील इतर विरोधी पक्षांसोबत चांगलं जमत आहे. यातून उद्धव ठाकरे यांची सर्वसमावेश अशी छवी निर्माण होत आहे. पण त्यांची हीच छवी एनडीएसाठी डोकंदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार?

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबाबत आणखी एक चर्चा सातत्याने सुरु असते. उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होतील, अशी चर्चा सुरु आहे. सत्ताधारी पक्षांकडून या चर्चांवर खिल्ली उडवली जात आहे. पण देशात भविष्यात खरंच परिस्थिती तशी निर्माण झाली तर कदाचित उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान देखील बनू शकतात हे नाकारता येणार नाही. कारण इंडियामध्ये उदारमतवादी हिंदू चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांची छवी निर्माण होत आहे.

याशिवाय भाजपविरोधात उद्धव ठाकरे जितकं रान पेटवू शकतात तितकं कोणीही पेटवू शकत नाही हे वास्तविक सत्य आहे. त्यामागील कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची झालेली वाताहत. असं असताना आगामी काळात काय घडामोडी घडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...