AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, लातूरच्या फुटीप्रकरणी निवृत्त प्राध्यापकाबद्दल सीबीआयला असं कळलं तरी काय?

NEET 2026 : नीट (NEET) पेपरफुटीनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. आता लातूरच्या फुटीप्रकरणी निवृत्त प्राध्यापकाबद्दल देखील सीबीआयला मोठी माहिती मिळालेली आहे.

NEET 2026 :  नीट पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, लातूरच्या फुटीप्रकरणी निवृत्त प्राध्यापकाबद्दल सीबीआयला असं कळलं तरी काय?
Neet 2026
| Updated on: May 15, 2026 | 11:48 AM
Share

NEET 2026 : नीट (NEET) ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणून तीन मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र पेपर लीक झाल्याचं लक्षात येताच आता सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. पेपरफुटीची माहिती मिळताच सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आताा सीबीआय याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. आता सीबीआय या गोष्टीची भूमिका बजावत आहेत की, याप्रकरणात अंतर्गत भूमिका कोणी कोणी बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील लातून येथील निवृत्त प्राध्यापकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सांगायचं झालं तर, पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. एवढंच नाही तर, 3 मे रोजीच्या परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका ज्या उच्च-सुरक्षा साखळीच्या अखत्यारीत होत्या, त्याच साखळीतून ही माहितीची समोर आली कशी, याचा देखील तपास अधिकारी तपास करत आहेत. सीबीआयने सर्व राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून तपशील मागवला आहे, ज्यांच्याकडे प्रश्नपत्रिका सीलबंद होण्यापूर्वी पोहोचतात. या महत्त्वपूर्ण तपासात परीक्षा प्रणालीशी संबंधित सर्व प्रमुख व्यक्ती आणि टप्प्यांचा समावेश आहे.

पुणे आणि लातूरमध्ये कारवाई…

पुण्यातील सुखसागर परिसरातून सीबीआयने मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला अटक केली आहे, जी ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करते… वाघमारे यांनी धनंजयसाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप आहे. तपासात असं देखील उघड झालं की, परीक्षेपूर्वी जवळपास अनेक बँक खात्यांमधून वाघमारे यांना पैसे पाठवण्यात आले होते.

तर, लातूरमध्ये ताब्यात घेण्यात आलेले निवृत्त प्राध्यापक दयानंद यांची देखील सीबीआय कसून चौकशी करत आहे . सूत्रांनुसार, प्राध्यापक प्रश्नपत्रिकेचं मराठीत भाषांतर करणाऱ्या समितीचा भाग होते. सांगायचं झालं तर, नीट परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाते, त्यामुळे भाषांतर प्रक्रियेदरम्यान कडक गोपनीयता राखणं आवश्यक असतं, पण नेमकी इथेच प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय दाट आहे. सध्या नीट पेपरफुटी प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

राजस्थान आणि गुडगावमधील नेटवर्क

राजस्थान येथील तीन संशयीतांपैकी एक दिनेश बिवाल याच्यावर असे आरोप आहेत की, लीक झालेल्या प्रश्नपत्रिकांची हार्ड कॉपी स्कॅन करून त्यांनी डिजिडल रुपात शेअर केल्या. बिवलने प्रश्नपत्रिका गुडगावच्या यश यादवकडून मिळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय आणि NTA चे काही अधिकारी देखील तपासात सामिल होऊ शकतात.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक