AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Nepal Flood Video: नेपाळमध्ये पूराने हाहाकार दिसला. मुसळधार पाऊस आणि नदीला आलेल्या महापूराने गावची गावं वाहून गेली. इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या. नेपाळमधून महापूराचे धडकी भरवणारे व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडेल.

Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!
नेपाळमध्ये महापूराने हाहाकार
| Updated on: Aug 26, 2026 | 5:07 PM
Share

नेपाळमध्ये महापूराने विध्वंस झाला आहे. होत्याचे नव्हते झाले आहे. आज सकाळी, जवळपास 9 वाजता उत्तर नेपाळमधील रसुवा या जिल्ह्याला महापूराचा फटका बसला. भोटेकाशी नदीने तिच्या सीमा विस्तारल्या. अचानक पूराचे पाणी अनेक शहरांत, गावात घुसले. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की गावाची गावं नेस्तनाबूत झाली. बाजार गायब झाले. पूल वाहून गेलंत. इमारती पत्त्यांप्रमाणे गडगडल्या. काही व्हिडिओ अत्यंत धडकी भरवणारे आहे. अनेकांच्या काळजाचा त्यामुळे थरकाप उडाला आहे.

अनेक जण गायब

रसुवा हे जवळपास 50 हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. सर्वाधिक फटका चीन-नेपाळ सीमावर्ती भागाला बसला आहे. जिल्हाधिकारी नरेंद्र परियार यांनी गाव आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साईट्सला सर्वाधिक फटका बसल्याचे म्हटले आहे. अनेक पूल वाहून गेल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत किती जण गायब झालेत. किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली नसल्याचे ते म्हणाले. पण मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

मुख्य कारण आले समोर

आतापर्यंत मुसळधार पावसाने हा विध्वंस झाल्याचे मानले जात होते. पण नेपाळच्या हवामान अंदाजानुसार, रसुवामध्ये गेल्या 24 तासात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. 7 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेला नाही. भोटेकाशी नदीच्या वरच्या पट्ट्यात तिबेटमध्ये मोठे काही घडल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. त्यानुसार एक बर्फाच्छादीत तलाव फुटल्यानेच या भागाला महापूराचा फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्रिशुली नदीत अचानक वाढले पाणी

नेपाळंमधील फुर्के खोला या परिसरात त्रिशुली नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ 160 किलोमीटर दूर नदीला पूर आला. नेपाळ-चीन नियंत्रण रेषेजवळील एका तलाव फुटल्याने नदीत वाऱ्याच्या वेगाने पाणी आल्याचा दावा करण्यात येत आहे. आता पुढे गंडक नदीत महापुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. पण बिहारच्या सीमावर्ती भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे. नेपाळमधील काही भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे