Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा किंचीत वाढ, कोरोनाबळी मात्र घटले

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 वर गेला आहे. (New 134154 Corona Cases )

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा किंचीत वाढ, कोरोनाबळी मात्र घटले
Corona

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 134154 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 34 हजार 154 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 887 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 11 हजार 499 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 वर गेला आहे. देशात 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 37 हजार 989 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 17 लाख 13 हजार 413 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,34,154

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,11,499

देशात 24 तासात मृत्यू – 2,887

एकूण रूग्ण –  2,84,41,986

एकूण डिस्चार्ज –2,63,90,584

एकूण मृत्यू – 3,37,989

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 17,13,413

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 22,10,43,693 (New 134154 Corona Cases )

संबंधित बातम्या :

कोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; इम्युनिटी वाढवण्याबरोबरच मिळतील बरेच लाभ

एक्स्पायर झालेले औषध चुकून घेतले तर काय होते? जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

(New 134154 Corona Cases in India in the last 24 hours)