Taj Mahal | जगदगुरू परमंहसाचार्य यांना ताज महालमध्ये जाताना रोखले, भगवे वस्त्र, हाती ब्रम्हदंड.. जवानांनी माघारी धाडले!

सीआयएसएफच्या जवानांनी जगद् गुरू परमंहसाचार्य यांना प्रवेश नाकारल्यानंतर त्यांच्याकडील तिकिटे इतर पर्यटकांना देण्यात आले. आचार्यांचे पैसेही परत करण्यात आले.

Taj Mahal | जगदगुरू परमंहसाचार्य यांना ताज महालमध्ये जाताना रोखले, भगवे वस्त्र, हाती ब्रम्हदंड.. जवानांनी माघारी धाडले!
Image Credit source: ANI
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Apr 27, 2022 | 11:53 AM

नवी दिल्लीः अयोध्येहून आग्रा येथील ताजमहाल (TajMahal) पाहण्यासाठी आलेल्या जगद् गुरू परमंहसाचार्य (Paramhans Acharya) यांना ताजमहालमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मीडिया रीपोर्ट्सद्वारे हाती आली आहे. जगद् गुरू परमंहसाचार्य यांनी भगवे वस्त्र (Saffron colour) परिधान केले होते. तसेच त्यांच्या हातात ब्रह्मदंड होता. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात जवानांनी त्यांना प्रवेश नाकाराला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.  जगद् गुरू परमंहसाचार्य हे अयोध्येतून आज आग्रा येथे आले असताना त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. मात्र याबद्दल आचार्यांनी अजिबात खंत व्यक्त न करता तेथून माघार घेतल्याचंही सांगण्यात येत आहे.

का रोखले परमंहसाचार्यांना?

काही मीडिया रिपोर्टनुसार, अयोध्येहून आलेल्या जगद् गुरू परमंहसाचार्य यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. तसेच त्यांच्या हाती ब्रह्मदंड होता. जगद् गुरू परमंहसाचार्य यांच्या शिष्याने ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठीची तिकटं काढली होती. मात्र सीआयएसएफच्या जवानांनी ती स्वीकारली नाहीत. त्यानंतर जगद् गुरू परमंहसाचार्य हे आग्रा येथील ताजमहल न पाहताच माघारी फिरले.

सर्वांना आशीर्वाद देऊन माघारी फिरले

दरम्याव, सीआयएसएफच्या जवानांनी जगद् गुरू परमंहसाचार्य यांना प्रवेश नाकारल्यानंतर त्यांच्याकडील तिकिटे इतर पर्यटकांना देण्यात आले. आचार्यांचे पैसेही परत करण्यात आले. या घटनेनंतर आचार्यांनी सर्वांना आशीर्वाद देऊन तेथून निघण्याचा निर्णय घेतला. संतांचा असा अपमान झाल्यामुळे तेथील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी माफीदेखील मागितल्याचं वृत्त आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर या सर्व घटनेबदद्ल बोलण्यास ते तयार नाहीत.

हिंदू राष्ट्राची मागणी करणारे हेच!

जगद् गुरू परमंहसाचार्य यांनी काही महिन्यांपूर्वी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. यावरून त्यांनी सरकारला अल्टिमेटमही दिले होते. भारत सरकारने 02 ऑक्टोबरपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित केले नाही जलसमाधी घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र जलसमाधी घेण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली होती.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें