News9 Global Summit 2025: भारताची संस्कृती चीनपेक्षा जुनी, जागतिक योगदानातही भारत अग्रेसर
News9 Global Summit 2025 : LAPP समूहाचे माजी संचालक अँडियास लॅम्प यांनी भारताची प्रशंसा केली. जागतिक योगदाना भारत सदैव आघाडीवर असल्याचे कौतुक त्यांनी केले. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

जर्मनीमध्ये भारताचे मुख्य न्यूज नेटवर्क टीव्ही 9 नेटवर्कद्वारे News9 ग्लोबल समिट 2025 चे दुसरे पर्व आयोजित करण्यात आले आहे. 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी स्टटगार्ट येथे समिट होत आहे. या समिटमध्ये भारत आणि जर्मनी या दोन देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर जोर देण्यात आला. या समिटमध्ये अनेक बड्या लोकांनी त्यांचे विचार मांडले. LAPP समूहाचे माजी संचालक अँडियास लॅम्प यांनी भारताची प्रशंसा केली. जागतिक योगदाना भारत सदैव आघाडीवर असल्याचे कौतुक त्यांनी केले. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
भारताची संस्कृती चीनपेक्षा जुनी
अँडियास लॅम्प यांनी स्टटगार्ट आता केवळ एक शहर नाही तर सर्वांसाठी एक घर झाले आहे, असे सांगितले. त्यांनी गेल्या 45 वर्षांपासून भारतातील त्यांच्या व्यावसायिक अनुभवाविषयी माहिती दिली. त्यांच्या आईने 1950 च्या दशकात एक महिला म्हणून उद्योगाचे नेतृत्व केले. त्याकाळी ही गोष्ट अत्यंत धाडसी होती. लॅप यांनी उदाहरण देताना सांगितले की, त्यांचा ब्रँड Girtlex च्या कंट्रोल केबल्सची गुणवत्ता त्यांच्या आईने सुनिश्चित केली.
त्यांनी संस्कृतीवर भर दिला. चीनची संस्कृती 5,000 वर्ष जुनी आहे. तर भारताची त्यापेक्षा अगोदर 6,000 वर्षे जुनी आहे. स्टटगार्टमध्ये संगीताची संस्कृती 30,000 वर्ष जुनी असल्याचे ते म्हणाले. भारताने त्यांच्या समृद्ध संस्कृतीचा आदर करावा आणि जागतिक योगदान कधीही विसरू नये असे आवाहन त्यांनी केले.
भारताची अर्थव्यवस्था गतिमान
क्रीडा आणि शिक्षणातील योगदानाचे उदाहरण त्यांनी दिले. लॅम्प म्हणाले की बंगळुरूमध्ये फुटलबॉल मैदान तयार करण्यात आले आहे. तिथे वार्षिक टुर्नामेंट आयोजित करण्यात येते. विज्ञान आणि शिक्षणात भारत-जर्मनी यांच्यातील भागीदारी वाढली आहे. खासकरून 100 पेक्षा जास्त शाळांमध्ये ही भागीदारी दिसून आली. कोविड-19 जागतिक महामारीच्या काळात भारताने व्हॅक्सिन तयार करून मदत केली, याचा उल्लेख करत त्यांनी जागतिक माध्यमांनी हे योगदान प्रभावीपणे दाखवले नसल्याची खंत व्यक्त केली.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी झेप घेईल असे ते म्हणाले. लॅब ग्रुपच्या प्रकरणात भारत अगोदरच दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.
