AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात डॉक्टरचा साईड बिझनस, कैद्यांना दुप्पट भावात मोबाईलची विक्री, NIA ने केली कारवाई

लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेला टी. नसीर हा २००९ पासून बेंगळुरू तुरुंगात सजा भोगत आहे. साल २०२३ मध्ये तुरुंगात कट्टरतावादाचे धडे दिल्या प्रकरणात त्याची चौकशी सुरु आहे.

तुरुंगात डॉक्टरचा साईड बिझनस, कैद्यांना दुप्पट भावात मोबाईलची विक्री, NIA ने केली कारवाई
NIA
| Updated on: Jul 22, 2025 | 7:56 PM
Share

बंगलुरु सेंट्रल हैराण करणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे तुरुंगात असलेल्या लष्कर -ए- तोयबाच्या एका अतिरेक्याकडे मोबाईल असल्याचा खुलासा झाल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) कामाला लागली होती. त्यानंतर तपासात जे सत्य उघडकीस आले ते कुंपणानेच शेत खाल्ल्याचे निघाले. या अतिरेक्यासह अन्य कैद्यांना या तुरुंगातील एक मानसउपचार तज्ज्ञचे तिप्पट भावाने मोबाईल विकत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

एनआयएने केलेल्या तपासात मानसोपचार तज्ज्ञ एका मोबाईलच्या दुकानातून ८ ते ९ हजाराचे मोबाईल विकत घ्यायचा आणि या कैद्यांना २५ हजार रुपयांना विकायचा असे उघडकीस आले आहे. दुप्पट कमाईमुळे त्याला चांगला फायदा होत असल्याने त्याने हा साईड बिझनस चालू केला होता. या मानसोपचार तज्ज्ञांची तपासणी केली जात नव्हती त्यामुळे त्याचा हा धंदा बिनबोभाट सुरु होता. त्याचे नाव डॉ. एस. नागराज असून एनआयए त्याची चौकशी सुरु केली आहे.

मोबाईल खरेदीसाठी प्रेयसीची मदत

एनआयए तुरुंगाच कट्टरपंथाची लागण झाल्याचा तपास करत आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ४७ वर्षीय दोषी थडीयंताविद नसीर याच्यावर तुरुंगातील तरुणांना कट्टरतेचे धडे देत असल्याचा एनआयएचा आरोप आहे. या दरम्यान मानसोपचार तज्ज्ञ डॉ.एस.नागराज याचा हा कारनामा उघडकीस आला आहे. हा डॉक्टरचे राहणीमान आलिशान होते. त्याच्या दोन प्रेयसी होत्या. त्या देखील मोबाईल खरेदी आणि त्याचे वितरण कैद्यांना करण्यात मदत करायच्या असे उघडकीस आले आहे.

तुरुंगाच्या हाय सिक्युरिटी बॅरकमध्ये बंद असलेल्या टी.नसीर सारख्या दोषी कैद्यांकडे मोबाईल फोन खरेदीसाठी पैसा आला त्याच्या स्रोताची चौकशी एनआयए करीत आहे. डॉक्टरने अन्य कैद्याच्या तुलनेत त्याला आणखीन जादा पैसे आकारात मोबाईल विकल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे नसीरकडे इतके पैसे तुरुंगात असताना आले कसे याचा तपास एनआयए करत आहे.

रोख रक्कम देऊन फोन खरेदी

हे फोन रघु याच्या नावाने खरेदी केले गेल्याचे कोर्टात एनआयएने सांगितले. आरोपी नंबर १ टी.नसीर हा वापरत असलेला मोबाईलही रघु याच्या नावाने प्रिया मोबाईल दुकानातून खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. जेलमध्ये मोबाईल तस्करीसाठी मानसोपचार तज्ज्ञाने कॅश स्वरुपात पैसे स्वीकारल्याचे उघड झाले आहे. आता कोर्टाने जेल अधिकाऱ्यांना हे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी एनआयएला मदत करण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात डॉ. एस नागराज याचा सहभाग उघड झाल्यानंतर त्याला ८ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे.टी. नसीर याला केरळ येथील दहशतवादी कृत्या प्रकरणात अटक झाली होती. सध्या त्याच्यावर २००८ च्या बंगलुरु सिरियल ब्लास्ट आणि जेलमध्ये कट्टरवाद पसरवल्याच्या प्रकरणात केस सुरु आहे. या प्रकरणात अन्य कैद्यांची चौकशी केली जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.