AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीलकंठ वर्णींचा सर्वात उंच पुतळा जगभर शांतीचा संदेश देईल : पूज्य महंत स्वामी महाराज

नवी दिल्लीच्या अक्षरधाम येथे १०८ फूट उंच नीलकंठ वर्णी पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. परम पूज्य महंत स्वामी महाराजांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. हा पुतळा जगभरात शांतीचा संदेश देईल आणि भावी पिढ्यांना अध्यात्मिक प्रेरणा देईल, असे स्वामी महाराजांनी सांगितले. श्रद्धा आणि भक्तीचे हे केंद्र वैश्विक मूल्ये दृढ करेल.

नीलकंठ वर्णींचा सर्वात उंच पुतळा जगभर शांतीचा संदेश देईल : पूज्य महंत स्वामी महाराज
Nilkanth Varnis statue
| Updated on: Mar 26, 2026 | 1:03 PM
Share

नवी दिल्लीच्या जगप्रसिद्ध स्वामिनारायण अक्षरधाम येथे नीलकंठ वर्णी यांच्या 108 फूट उंच पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा पार पडला. भगवान स्वामिनारायण यांच्या बाल तपस्वी स्वरुपाचं दर्शन या पुतळ्यातून घडतं. हा ध्यानमग्न पुतळा आहे. बालस्वरुपात असताना त्यांनी चार महिने अन्नपाण्याविना काढले होते. त्यांच्या तपश्चर्येचं हे प्रतिक होतं. वयाच्या केवळ 11 वर्षी सुरू झालेल्या प्रभु नीलकंठ यांच्या संपूर्ण भारतभर झालेल्या सात वर्षांच्या कल्याण यात्रेचे येथे दर्शन घडते. ही मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात आणि पावन सान्निध्यात अत्यंत श्रद्धा आणि भव्यतेने पार पडला. वैदिक विधी आणि अनुष्ठानांमध्ये जगभरातून आलेल्या हजारो भक्तांनी सहभाग घेतला.

आज पहाटेच भक्तांनी अक्षरधाम मंदिर परिसर फुलून गेला होता. पुरुष, महिला आणि मुलं पारंपारिक वेष परिधान करून आले होते. या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेवेओळी श्रद्धा आणि उत्साहाने सर्वच उपस्थित झाले होते. संपूर्ण परिसरात भजन, वैदिक मंत्रोच्चार आणि सामूहिक प्रार्थना सुरू होत्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं.

संपूर्ण परिसर भक्तीमय

पहाटे 6 वाजता नीलकंट वर्णीच्या प्रतिष्ठापनेचा पावन कार्यक्रम सुरू झाला. प्राचीन वैदिक परंपरेनुसार पूर्ण श्रद्धा आणि पावित्र्य जपत हा कार्यक्रम अत्यंत भक्तीपूर्ण वातावारणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून तब्बल 300 संत उपस्थित होते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय झाला होता. या कार्यक्रमाला शेकडो श्रद्धाळूही उपस्थित होते. पुष्प आणि धूपच्या सुंगधाने संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं. यावेळी प्रत्येक क्षण आध्यात्माची अनुभूती देत होता. यावेळी पूज्य महंत स्वामी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलकंठ वर्णी यांचा हा सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा जगाला शांतीचा संदेश देत राहील. जगात शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करत राहील, अशी प्रतिक्रिया पूज्य महंत स्वामी महाराज यांनी व्यक्त केली.

प्रतिष्ठेनंतर आपल्या आशीर्वचनांमध्ये महंत स्वामी महाराज म्हणाले, “ही सर्वात सुंदर मूर्ती आहे। ती संपूर्ण जगात शांततेचा प्रसार करेल। जो कोणी येथे नीलकंठ वर्णीचे दर्शन घेण्यासाठी येईल, त्याला सद्गुणांची प्रेरणा मिळेल आणि त्याचे कल्याण होईल। ही मूर्ती भक्तांच्या भावना आणि शुभेच्छाही पूर्ण करेल।”

नवीन अध्यात्मिक धाम

या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेनंतर नवी दिल्लीच्या स्वामिनारायण अक्षरधाम एक वैश्विक आध्यात्मकि, सांस्कृतिक आणि नैतिक केंद्र म्हणून आपली भूमिका अधिक सुदृढ करेल. नीलकंठ वर्णींचा हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना शांती, शिस्तबद्धता, भक्ती आणि उच्च जीवनमूल्यांची प्रेरणा देत राहील, असंही महंत स्वामी महाराजांनी सांगितलं.

वैराग्य आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक

१०८ फूट उंच ही प्रतिमा श्रद्धा, संयम आणि आध्यात्मिक साधनेचे प्रभावी प्रतीक आहे. नीलकंठ वर्णी यांनी बालवयात संपूर्ण भारतभर केलेला तपस्वी प्रवास आजही लाखो लोकांना त्याग, निर्भयता आणि भक्तीच्या आदर्शांकडे प्रेरित करतो. ही प्रतिमा या शाश्वत मूल्यांची प्रेरणादायी ओळख आहे।

भव्य उत्सव आणि भक्तांचा सहभाग

२५ आणि २६ मार्च रोजी आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ज्यामध्ये यज्ञ, सभा आणि मूर्ती प्रतिष्ठा समारंभ हे प्रमुख होते।

२५ मार्च रोजी परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत जागतिक शांतता यज्ञाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला। पांढऱ्या कबूतरांना आकाशात सोडून सध्या सुरू असलेल्या खाडी युद्धाच्या समाप्तीसाठी शांततेची प्रार्थना करण्यात आली।

२६ मार्च रोजी मुख्य प्रतिष्ठा समारंभ पार पडला, ज्यामध्ये महंत स्वामी महाराज यांनी १०८ फूट उंचीवर वैदिक विधी संपन्न केले।

महंत स्वामी महाराज यांच्या पावन उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम दिव्यतेने उजळून निघाला। भक्तांना त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळाला।

हा समारंभ संत, स्वयंसेवक आणि भक्तांच्या समर्पित सेवा भावामुळे अत्यंत सुव्यवस्थितरीत्या पार पडला। विशाल जनसमूहाच्या व्यवस्थापनापासून ते अनुष्ठान आणि आतिथ्य व्यवस्थेपर्यंत, हजारो स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने योगदान दिले।

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?