धक्कादायक, लिफ्टमध्ये चिरडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू

आंध्रप्रदेश येथे लिफ्टमध्ये अडकून एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू (nine years girl death by screaming in the elevator)  झाला आहे. ही धक्कादायक घटना हैद्राबादमधील हस्तिनापुरम नॉर्थ एक्सटेंशन कॉलनीत घडली.

धक्कादायक, लिफ्टमध्ये चिरडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू

हैद्राबाद : आंध्रप्रदेश येथे लिफ्टमध्ये अडकून एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू (nine years girl death by screaming in the elevator)  झाला आहे. ही धक्कादायक घटना हैद्राबादमधील हस्तिनापुरम नॉर्थ एक्सटेंशन कॉलनीत घडली. दुपारी 12.30 च्या दरम्यान मुलगी घरातून तिसऱ्या मजल्यावरुन जाण्यासाठी लिफ्ट घेत होती. यावेळी ही दुर्दैवी घटना (nine years girl death by screaming in the elevator) घडली. लस्या यादव असं या मुलीचं नाव आहे.

लस्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना तिचा पाय लिफ्टच्या दरवाज्यात अडकला. ती पाय बाहेर काढेपर्यंत तिसऱ्या मजल्यावरुन कुणीतरी लिफ्टचे बटन दाबले. त्यामुळे लिफ्टवर जाऊ लागली आणि लस्याचे शरीर लिफ्टमध्ये चिरडले.

लस्याचे वडील चंद्रशेखर यादव यांनी तातडीने अॅम्बुलन्सला कॉल केला. मुलीला बाहेर काढण्यात दोन तास लागले. यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी लस्याला मृत घोषीत केले.

लस्याचे कुटुंब नुकतेच आपल्या नवीन तीन मजली इमारतीत राहायला आले होते. लस्याच्या मृत्यूवर राज्य बाल अधिकार संघाचे अध्यक्ष पी अच्युता राव यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी लिफ्टच्या सुरक्षेचे व्यवस्थित पालन न केल्यामुळे ही घटना घडली, असा आरोप आरोप राव यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *