AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले

निर्भया साहूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या आता हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार आहेत.

निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले
| Updated on: Oct 02, 2020 | 4:16 PM
Share

लखनौ : देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया साहूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या आता हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार आहेत. त्यासाठी सीमा कुशवाहा गुरुवारी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी कुशवाहा यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिले नाही. (Nirbhaya lawyer Seema kushwaha will fight hathras rape victim)

याबाबत बोलताना सीमा कुशवाहा म्हणाल्या की, मी पीडितेच्या कुटुबियांना भेटल्याशिवाय परतणार नाही. पीडितेच्या कुटुबियांनीच मला त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची विनंती केली आहे. परंतु येथील प्रशासन मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही. यावेळी कुशवाहा यांनी सांगितले की, त्या पीडितेच्या भावाच्या संपर्कात आहेत.

सीमा कुशवाहा यांनी निर्भया बलात्कार खटल्यात निर्भयाच्या कुटुंबाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीवर 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. निर्भयाला उपचारांसाठी सिंगापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे उपचारांदरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

कुशवाहा या निर्भयाच्या बाजूने न्यायालयात उभ्या राहिल्या. त्यांच्या कठोर मेहनतीमुळेच या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या वर्षी 20 मार्च रोजी चारही आरोपींना फाशी देण्यात आली. सीमा कुशवाहा आता हाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तिची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. परंतु उत्तर प्रदेशमधील प्रशसन त्यांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही.

बलात्कारानंतर गळा आवळून हत्येचा प्रयत्न

यूपीच्या हाथरस (Hathras) जिल्ह्यात राहणारी मुलगी, 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना, चार नराधमांनी तिला खेचत बाजूला नेले. नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार (GangRape) केला. मग तिच्या पाठीचा मणका मोडला. इतक्यावर ते थांबले नाहीत. बोलता येऊ नये म्हणून पीडितेची जीभही छाटली. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली.

पीडितेच्या गळ्यात तीन फ्रॅक्चर झाले होते. 15 दिवसांपर्यंत ती इशाऱ्यांत आपल्या असह्य वेदना मांडत होती. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. 22 सप्टेंबरला रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. तिने दिलेल्या जबाबावरून चारही नराधमांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून मित्रांमध्ये व्हायरल

(Nirbhaya lawyer Seema kushwaha will fight hathras rape victim)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.