Bihar Election Result: नितीश कुमार की भाजपचा नेता, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? फडणवीसांनी थेट सांगितलं

Bihar next CM Name: बिहार विधानसभा निवडणुकीत NDA मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Bihar Election Result: नितीश कुमार की भाजपचा नेता, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? फडणवीसांनी थेट सांगितलं
Bihar Next CM Name
| Updated on: Nov 14, 2025 | 5:11 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत NDA आघाडी शानदार विजय मिळवताना दिसत आहे. भाजप आणि जेडीयू हे दोन प्रमुख पक्ष असलेल्या या आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न समोर येत आहे. NDA ने नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. मात्र कोणत्याही नेत्याचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले नव्हते. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

फडणवीसांनी मानले जनतेचे आभार

बिहार विधानसभेतील एनडीएला मिळालेल्या यशाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मी बिहारच्या जनतेचे आणि सर्व मतदारांचे आभार मानतो. बिहारने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. चिराग पासवास, मांझी अशी आमची युती होती, त्याला चांगला प्रतिसाद जनतेले दिला. यातून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेचा असलेला विश्वास दिसून आला आहे.’

राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला बिहारच्या जनतेने उत्तर दिले – फडणवीस

या निकालानंतर काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला बिहारच्या जनतेने उत्तर दिले आहे. ते संविधानिक संस्थांचा अपमान करत आहेत. ते अपमान थांबवत नाहीत तोपर्यंत त्यांची अवस्था अशीच असेल. काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांचे सर्व मुद्दे फेल ठरले आहेत. हे खोटारडे लोक आहेत, जोपर्यंत ते सत्य स्वीकारलं नाही, तर त्यांचे पतन सुरूच राहील.

कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? फडणवीस म्हणाले …

बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे, आता नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील. मला यावर बोलण्याचा अधिकार नाही, आमचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील.’ या आधी विनोद तावडे यांनीही बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असं विधान केलं होतं.