AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुने गडी, जुनाच डाव… नितीशकुमार यांची नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; राजभवनात ‘जय श्रीराम’च्या घोषणा

बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांचा जुने गडी, जुनाच डाव पाहायला मिळाला आहे. नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या टर्ममधील त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

जुने गडी, जुनाच डाव... नितीशकुमार यांची नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; राजभवनात 'जय श्रीराम'च्या घोषणा
| Updated on: Jan 28, 2024 | 5:26 PM
Share

पाटणा | 28 जानेवारी 2024 : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांचा जुने गडी, जुनाच डाव पाहायला मिळाला आहे. नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या टर्ममधील त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चौधरी शपथ घेण्यासाठी आले असता यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी विजय सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नितीशकुमार यांनी आज सकाळीच राजभवन गाठून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केली आणि संध्याकाळी शपथविधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण आठ मंत्री असणार आहेत. तर दोन उपमुख्यमंत्रीही असणार आहे. राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा पार पडला. हा सोहळा सुरू असतानाच जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या.

नड्डा यांची हजेरी

नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप नेते विनोद तावडेही उपस्थित होते. याशिवाय भाजपचे अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते. या टर्ममधील नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी टर्म आहे. या आधी त्यांची आरजेडीसोबत राज्यात सत्ता होती. दोन्ही आघाडीने 17 महिने राज्याची सत्ता सांभाळली. मात्र, राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर अचानक बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला. पक्षातील नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरल्यानंतर नितीशकुमार यांनी जेडीयूची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

इंडिया आघाडीचा आधारवड

इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटना येथे झाली होती. नितीशकुमार यांनीच ही बैठक आयोजित केली होती. मात्र, इंडिया आघाडीत अनेक गोष्टी वेळेत झाल्या नाहीत. आघाडीत काही गोष्टी व्यवस्थित नव्हत्या. त्यामुळेच आघाडीतून बाहेर पडल्याचं नितीशकुमार यांचं म्हणणं आहे. ज्याने इंडिया आघाडीची पहिली बैठक आयोजित केली होती, तेच आघाडीतून बाहेर पडल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे नितीशकुमार एनडीएत आल्याने एनडीए अधिकच मजबूत झाला आहे.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.