वृद्धेनं बर्थ डे विश सांगताच पोलीस हादरले, महिलेची थेट तुरुंगात रवानगी, सर्वांनाच बसला मोठा धक्का
एका महिलेनं आपल्या वाढदिवशी अशी इच्छा सांगितली की, त्यामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला, या वृद्ध महिलेची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या महिलेचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तुम्ही गुन्हेगारांना जेलमध्ये घेऊन जाताना पाहिलं असेल, मात्र तुम्हाला जर सांगितलं की, एका 104 वर्षांच्या महिलेला तिने कोणताही गुन्हा केला नसताना देखील पोलीस तिला जेलमध्ये घेऊन गेले तर? तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, परंतु अशी घटना घडली आहे. पोलिसांनी एका 104 वर्षांच्या महिलेला तिचा कोणताही गुन्हा नसताना तिच्या हातात बेड्या घालून जेलमध्ये टाकलं. या महिलेनं कोणताच गुन्हा केला नव्हता, आणि कोर्टाकडून देखील तिला कोणत्याच प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली नव्हती, मग नेमकं असं काय घडलं? ज्यामुळे पोलिसांनी या महिलेला थेट तुरुंगात टाकलं. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण?
महिलेला पोलिसांनी का अटक केली?
ही घटना अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील लिविंगस्टन काउंटीमध्ये घडली आहे. लोरेटा असं या 104 वर्षीय महिलेचं नाव आहे, तिला तिच्या वाढदिवशी तिची बर्थ डे विश काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा या महिलेनं पोलिसांना सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की माझा बर्ड डे हा जेलमध्ये साजरा केला जावा. मी माझ्या आयुष्यात जेल कसं असतं? हे कधीच पाहिलं नाहीये, मला कैद्याच्या जगण्याचा एकदा अनुभव घ्यायचा आहे, अशी आपली इच्छा या महिलेनं बोलावून दाखवली. पोलिसांना या महिलेची इच्छा ऐकून धक्काच बसला, मात्र पोलिसांनी या महिलेची ही इच्छा पूर्ण केली.
पोलिसांनी या महिलेच्या वाढदिवसाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. पोलिसांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लोरेटा यांनी आमच्यासोबत चांगला वेळ घालवला, आम्हाला त्यांचा वाढदिवस साजरा करून आनंद वाटला, त्यांना आम्ही काही काळ जेलमध्ये देखील बंद केलं, त्यांनी कैद्याच्या आयुष्याचा अनुभव देखील घेतला. जेलमध्येच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
