Raigad Boat: हरीहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरच्या संशयास्पद बोटीचे ओमान कनेक्शन, राज्यभरात रेड अलर्ट, जाणून घ्या 10 महत्त्वा्च्या गोष्टी

ही स्पीड बोट सापडण्यामागे कोणताही दहशतवादी अँगल नसल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने यातील कोणतीही शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही बोट मस्कतवरुन युरोपला जात होती. २६ जून २०२२ रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले होते, त्यानंतर ही बोट भरकटत हरीहरेश्वर किनाऱ्याला लागली असल्याची माहिती कोस्टगार्डने दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

Raigad Boat: हरीहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरच्या संशयास्पद बोटीचे ओमान कनेक्शन, राज्यभरात रेड अलर्ट, जाणून घ्या 10 महत्त्वा्च्या गोष्टी
संशयास्पद बोटीबाबत १० अपडेट्स Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 5:16 PM

रायगड- हरीहरेश्वर (Harihareshwar)समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली बोट ही ओमानची (Oman connection)असल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट भरकटलेली होती. नेपच्युन मेरिटाईम सिक्युरिटी कंपनीने ही माहिती दिली आहे. जूनमध्ये ओमानच्या समुद्रात काही बोटी भरकटल्या होत्या, त्यापैकी एक बोट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या बोटीवर 3 एके 47 रायफली ( AK 47 rifles)आणि जिवंत काडतुसांचा साठा हाती लागला होता. त्यानंतर सणासुदीच्या दिवसांमुळे राज्यभरात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभरातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.

सध्यातरी दहशतवादी अँगल नाही – फडणवीस

ही स्पीड बोट सापडण्यामागे कोणताही दहशतवादी अँगल नसल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने यातील कोणतीही शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही बोट मस्कतवरुन युरोपला जात होती. 26 जून 2022 रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले होते, त्यानंतर ही बोट भरकटत हरीहरेश्वर किनाऱ्याला लागली असल्याची माहिती कोस्टगार्डने दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. कोस्टगार्ड आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संपर्कात असून या बोटीची चौकशी करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. बोटीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

सशंयास्पद बोटीबाबतच्या दहा महत्त्वाचे मुद्दे

  1. रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडली ओमानची बोट
  2. हरीहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीत 3 एके 47 रायफली आणि जिवंत काडतूसं
  3. नेपच्यून मेरीटाईमच्या कंपनीची बोट असल्याची माहिती
  4. बोट भरकटली असल्याची नेपच्यून मेरीटाईम कंपनीची कबुली
  5. जूनमध्ये ओमानच्या समुद्रात काही बोटी भरकटल्या होत्या, त्यापैकी एक बोट असण्याची शक्यता
  6. एटीएस आणि एनआयएची टीमही घटनास्थळी दाखल, एटीएस प्रमुख विनित अग्रवालही रवाना
  7. यामागे काही दहशतवादी हल्ल्याचा, घातपाताचा कट होता का, या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे.
  8. ही संशयित बोट हरीहरेश्वर समुद्रात मच्छइमारांना आधी दिसली होती, त्यांनी ही माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली.
  9. ही संशयित बोट आढळली त्यात कोणतीही व्यक्ती नव्हती, काही बॉक्सेस होते, त्यात रायफली आणि काडतुसे सापडली आहेत.
  10. रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात हायअलर्ट, मुंबई, पुण्यातही नाकाबंदी आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क
Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.