Omicron : ख्रिसमसच्या तोंडावर गोव्याला धडकी, ओमिक्रॉनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ

गोवा राज्यात ओमिक्रॉनने एन्ट्री केल्याची शक्यता आता बळावली आहे. कारण ओमिक्रॉनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. रशियामधून आलेला प्रवाशांचा ग्रुप कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Omicron : ख्रिसमसच्या तोंडावर गोव्याला धडकी, ओमिक्रॉनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ
OMICRON
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 6:10 PM

गोवा : ओमिक्रॉनने देशात पुन्हा दहशतीचं वातावरण परवले असताना, ख्रिसमसच्या तोंडावर आता गोव्याच्या चिंतेतही भर पडली आहे. सर्वात जास्त परदेशी पर्यटक गोव्यात दाखल होतात. त्यामुळे ओमिक्रॉनचा सर्वात मोठा धोका हा गोव्याला आहे. त्यात ख्रिसमसच्या तोंडवर गोव्याला ओमिक्रॉनने दस्तक दिल्यानं गोव्यातील व्यवसायिकांनाही धडकी भरली आहे. कारण व्यापाऱ्यांना ख्रिसमसच्या सणाला मोठ्या नफ्याची अपेक्षा असते आणि नेमके याचवेळी ओमिक्रॉनने दस्तक दिल्याने चिंतेचं वातावरण आहे.

गोव्यातही ओमिक्रॉनची एन्ट्री?

गोवा राज्यात ओमिक्रॉनने एन्ट्री केल्याची शक्यता आता बळावली आहे. कारण ओमिक्रॉनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. रशियामधून आलेला प्रवाशांचा ग्रुप कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे इतर अहवाल येणे अजून बाकी आहे. त्यामुळे तुर्तास ठाम माहिती समोर आली नसली तरी गोव्यात ओमिक्रॉनचे काही रुग्ण आढळून येण्याच शक्यता बळावली आहे. संशयित प्रवासी सध्या विलगीकरण कक्षात आहेत.

ओमिक्रॉन आढळल्यास आर्थव्यवस्थेवर परिणाम

ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे गोवा सरकारची चिंता वाढली आहे. कारण ओमिक्रोन आढळल्यास गोव्याच्या आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शक्यतो. गोव्याला जास्तीत जास्त महसूल हा पर्यटन व्यवसायामुळे मिळतो. आणि ओमिक्रॉनचा निश्चितच पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचंं मोठं नुकसान होऊ शकते. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे त्याचा हॉटेल व्यवसायापासून इतर अनेक व्यवसायांना मोठा फायदा होतो. आतापर्यंत ओमिक्रॉनने जवळपास 40 पेक्षा जास्त देशात एन्ट्री केली आहे. त्याचबरोबर भारतातील ओमिक्रॉन आढळलेली राज्यही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

4 विमान कंपन्यांवर विमानतळ प्राधिकरणाचे 2700 कोटी थकीत, एअर इंडियाचे सर्वाधिक पैसे

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, सरकार अभ्यास करेल, नवाब मलिकांची माहिती; ओबीसी नेते आक्रमक

जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 21 शेळ्या ठार ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.