AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक मंदिर, एक विहीर अन् एक स्मशानभूमीचा मोहन भागवत यांचा संदेश, जातीवाद संपवून ऐक्य निर्माण करण्याचे आवाहन

RSS Chief Mohan Bhagwat: मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, संघाच्या स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांना एकमेकांच्या घरी आमंत्रित केले पाहिजे.

एक मंदिर, एक विहीर अन् एक स्मशानभूमीचा मोहन भागवत यांचा संदेश, जातीवाद संपवून ऐक्य निर्माण करण्याचे आवाहन
मोहन भागवत
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 21, 2025 | 9:12 AM
Share

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशातील अलिगडमधून जातीय भेदभाव संपवून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संघाच्या ‘स्वयंसेवकांना’ संबोधित करताना भागवत म्हणाले की, हिंदू समाजाने एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी या तत्त्वाचा अवलंब करून सामाजिक एकता मजबूत करावी. संघ प्रमुख पाच दिवसांचा दौऱ्यानंतर सोमवारी नवी दिल्लीत जाणार आहे.

स्वयंसेवकाशी संवाद साधताना मोहन भागवत म्हणाले की, एकतेच्या माध्यमातून भारताची जबाबदारी केवळ सामाजिक पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरही पार पाडता येईल. जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित केल्याशिवाय खरे सामाजिक ऐक्य होऊ शकत नाही. हिंदू समाजाचा पाया संस्कार आहे. समाजास पारंपारिक, सांस्कृतिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारित बनवणे आवश्यक आहे.

एकमेकांच्या घरी आमंत्रित करा

मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, संघाच्या स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांना एकमेकांच्या घरी आमंत्रित केले पाहिजे. त्यामुळे तळागाळात एकता आणि सौहार्दाचा संदेश दिला जाईल. कुटुंब हा सामाजिक एकतेचा एक मूलभूत भाग आहे. ते संस्कारच्या मजबूत कौटुंबिक मूल्यांवर आधारलेले आहे. भारत आता थांबणार नाही. भारताचा चौफर विकास होणार आहे.

सण-उत्सव एकत्र साजरे करा

संघ प्रमुखांना सण-उत्सव एकत्र साजरे करण्याचे आवाहन केले. त्यामुळे राष्ट्रीयता आणि सामाजिक एकता मजबूत होईल, असे त्यांनी म्हटले. संघ प्रमुख मोहन भागवत यांचा दौरा १७ एप्रिल रोजी सुरु झाला. त्यांचा हा पाच दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यात ते संघाच्या प्रचारकांसोबत बैठका घेत आहे. आपल्या दौऱ्यात मोहन भागवत यांनी एच.बी. इंटर कॉलेज आणि पंचन नगरी पार्कमधील शाखांना भेट दिली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा