22 प्रमुख देशांची मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड हादरा, भारताला लागला जॅकपॉट
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला आहे, या टॅरिफचा परिणाम हा दोन्ही देशांवर देखील होताना दिसत आहे, मात्र टॅरिफचा दबाव असतानाच आता भारतासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे. 22 देशांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रशियासह कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या 22 देशाचा समूह ओपेक प्लस (OPEC+) ने रविवारी मोठी घोषणा केली आहे. येत्या नोव्हेंबरपासून तेलाच्या उत्पादनामध्ये प्रति दिन 1,37,000 बॅरल एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला आहे, मात्र त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे ओपेक प्लसकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता हे कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्या मागचा मुख्य उद्देश हा अमेरिकेच्या शेल उत्पादकांसारख्या स्पर्धकांकडून पुन्हा एकदा बाजारपेठेचा ताबा मिळवणे हा आहे.काही महिन्यांपूर्वी ओपेक प्लस देशांकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्यात आली होती, ही कपात हळूहळू कमी करण्याच्या धोरणाचा देखील हा एक भाग आहे. ओपेकेचा हा निर्णय अमेरिकेला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान भारत हा जगातील एका मोठा तेल आयातदार देश असल्यामुळे याचा परिणाम हा भारतावर होऊ शकतो. भारत जवळपास 85 टक्के तेलाची आयात ही ओपेक प्लस देशांकडून करतो. जागतिक बाजारपेठेत तेलाचं उत्पादन वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात आणि त्याचा थेट फायदा हा भारताला होण्याची शक्यता आहे.
रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, यासाठी भारतासह अनेक देशांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे. रशियाऐवजी या सर्व देशांनी अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी करावी असा त्यामागे ट्रम्प यांचा हेतू आहे. सोबतच रशियाकडून जे देश तेलाची खरेदी करतात त्या पैशांमधून रशियाला युक्रेसोबतच्या युद्धासाठी फंड मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
ओपेक प्लस हा रशियासह छोट्या-छोट्या देशांचा असा समूह आहे, जो कच्च्या तेलाचं उत्पादन करतो.या देशानं तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं आता बाजारपेठेत मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे. मात्र या निर्णयामुळे भारताचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात.
